विद्यार्थिनींवर अत्याचार करणार्‍या नराधम मुख्याध्यापकास अटक

0

वरणगाव पोलिसांनी फैजपूरात सापळा रचून केली कारवाई

भुसावळ: तालुक्यातील बोहर्डी बु.॥ जिल्हा परीषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकाने इयत्ता तिसरीमध्ये शिक्षण घेणार्‍या नऊ वर्षीय विद्यार्थिनीवर लैगिंक अत्याचार केल्याची घटना शनिवारी उघडकीस आल्यानंतर शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली होती. शिक्षकी पेक्षाला काळीमा फासणार्‍या या घटनेनंतर आरोपी पसार झाला होता तर आरोपीने शाळेतील आणखी विद्यार्थिनींवर अत्याचार केल्याचा आरोप आहे.

फैजपूरात सापळा रचून अटक
आरोपी मुख्याध्यापक गणेश चुडामण कोलते (वय 48, रा. मच्छींद्र नगर, वरणगाव) हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पसार झाला होता. वरणगाव पोलिसांना आरोपी फैजपूरातील आसाराम नगरात लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश परदेशी, एएसआय रहिवरअली सैय्यद, रवींद्र बोंडे, तडवी यांनी आरोपीच्या सोमवारी पहाटे दिड वाजेच्या सुमारास मुसक्या आवळण्यात आल्या. आरोपीस सोमवारी दुपारी भुसावळ सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.