विद्यार्थिनीची आत्महत्या

0

बारामती । स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्‍या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बारामतीत घडली. किर्ती जगन्नाथ शेरे असे तिचे नाव आहे.

सीआरपीएफच्या कमांडोने फसवणूक केल्याचे तिने आत्महत्येपुर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे. याप्रकरणी गणेश राऊत या कमांडोविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेशने प्रेमात फसवणूक केल्याचे तिने चिठ्ठीत म्हटले आहे. त्याचबरोबर गोरख राऊत, शितल, सुप्रीया, महादेव निगडे, किरण निगडे, संजय निगडे, सचिन काटे यांनी मैत्रीच्या नावावर ब्लॅक मेल करून मानसिक त्रास दिल्याचे चिठ्ठीत म्हटले आहे. याबाबत पोलीस तपास सुरू आहे.