जळगाव – शहरातील शिवाजीनगर परिसरात राहणार्या एका शाळकरी विद्यार्थिनीला 3 एप्रिल रोजी अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळविले. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजीनगर परिसरात राहणारी 13 वर्ष 8 महिन्यांची विद्यार्थिनी 3 एप्रिल रोजी घरी लहान भावासह होती. तिचे आई-वडील त्यावेळी बाजारात गेलेले होते. संधी साधून कुणीतरी तिला फूस लावून पळवून नेले. घरी आल्यावर तिच्या आई-वडीलांनी शोध घेतला असता ती मिळून आली नाही. याप्रकरणी शनिवारी रात्री शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.