नवी दिल्ली। केरळमधील कन्नूर येथे वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेश परीक्षा नीट दरम्यान एका विद्यार्थिनीस अंतर्वस्त्र काढण्यास भाग पाडल्याप्रकरणी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) 4 शिक्षकांना निलंबित केले आहे तसेच मंडळाने संबंधित सेंटरच्या प्राचार्यांना माफी मागण्याचे निर्देश दिले आहे.
मंडळाचे चेअरमन आर.के.चतुर्वेदी यांनी मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेतली. त्यानंतर मंडळाने ही कारवाई केली. मंडळाने या घटनेला अमानवी कृत्य असल्याचे म्हटले आहे. टीआयएसके इंग्लिश मेडियम स्कूलचे प्राचार्य जमालुद्दीन म्हणाले, चौकशी अंती महिला शिक्षिकांना निलंबित करण्यात आले आहे. असे असले तरी अद्याप आपणास कोणतीही तक्रार मिळाली नाही.
दरम्यान, केरळच्या कन्नूरमधील परियारम येथे नीट परीक्षा द्यायला गेलेल्या एका विद्यार्थिनीस अंतर्वस्त्र काढण्यास भाग पाडण्यात आले. त्यावरून वाद निर्माण झाला असून राज्य महिला आयोगाने चौकशीचे आदेश दिले आहेत. केरळ बाल हक्क आयोगाने याबाबत 10 दिवसांत सीबीएसईकडून अहवाल मागवला. या प्रकरणी दुखावलेले असंख्य पालक संतप्त झाले आहेत. अनेकांनी सीबीएसई व राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले. दुसरीकडे, केरळ विधानसभेत प्रकरण उपस्थित झाल्यानंतर मुख्यमंत्री विजयन म्हणाले, महिला पोलिस अधिकार्यास विद्यार्थिनी तिच्या नातेवाइकांना भेटण्यास सांगितले आहे.
जीन्स काढण्याचे फर्मान
टपाल कर्मचारी व्ही. राजेश यांच्या मुलीला जीन्सवरील धातूची बटणे काढण्यास बजावले. तिने तक्रार केल्यावर खिसे असल्यामुळे तिला जीन्सच काढण्यास फर्मावले. एवढेच नव्हे तर तिला टॉपही काढण्यास सांगितले. त्यामुळे राजेश यांना परीक्षा केंद्रापासून 3किलोमीटर जाऊन लेगीस आणावी लागली.
…मुळे अंतर्वस्त्रे काढण्यास फर्मावले
मेटल डिटेक्टरमधून गेल्यानंतर बीपचा आवाज आल्यामुळे परीक्षा केंद्र अधिकार्याने आपल्या मुलीस अंतर्वस्त्रे काढून येण्यास फर्मावले, असे विद्यार्थिनीच्या आईने म्हटले आहे. अनेक ठिकाणी गुडघ्याच्या खाली असलेले चुडीदार टॉप्स, लांब स्लीव्ह्ज कापण्यात आल्या. या कडक नियमांमुळे परीक्षेच्या दिवशी दुकाने बंद असल्याने अनेक पालकांनी शेजार्यांकडे कपडे मागावे लागले. याशिवाय केरळ आणि तामिळनाडूत डोक्यावरील दुपट्टे काढून टाकायला