शेंदुर्णी। विद्यार्थींनींनी बौद्धिक विकासाबरोबरच शारिरीक विकासावर सुध्दा भर देणे गरजेचे असून आरोग्य विषयी काळजी घ्यायला हवी असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.व्ही.आर.पाटील यांनी केले. आप्पासाहेब रघुनाथराव भास्करराव गरुड महाविद्यालय शेंदुर्णीच्या ‘ती’ ची गरुडझेप मंचातर्फे आयोजित विद्यार्थींनींशी हितगुज या कार्यक्रमात ते बोलत होते. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांना स्वतःच्या आरोग्याची काळजी घेऊन नवीन सक्षमपिठी निर्माण करण्यासाठी राष्ट्रास सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. ’ती’ ची गरुडझेप मंचातर्फे 10 दिवशीय शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
ग्रामीण भागातील मुलींच्या आरोग्याचे संवर्धन, समस्यांचे निर्मुलन, सक्षमीकरणाची जाणीव यासाठी मंचातर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्यात रुबेल लसिकरण, कराटे प्रशिक्षण, महिला उद्योजकता गुणधर्म विकास कार्यक्रम, व्यक्तिमत्व विकास विकास, पार्लर प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यावेळी प्रा.निरुपमा वानखेडे, प्रा.योगिता चौधरी, प्रा.वर्षा लोखंडे, प्रा.छाया पाटील, प्रा.रिना पाटील, प्रा.अमर जावळे, प्रा.डॉ.संजय भोळे यांच्या सह शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.