विद्यार्थींनीची गळफास घेवून आत्महत्या

0

नंदुरबार । अक्कलकुवा तालुक्यातील केंद्रीय नवोदय विद्यालयातील दहावीत शिकणार्‍या विद्यार्थीनीने शाळेतच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. आत्महत्येचे कारण मात्र अजून समजलेले नाही. वसतीगृहातील जीन्यात हा प्रकार झाल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. जागृती ही मुळची धडगाव तालुक्यातील विद्यार्थीनी आहे. तिने आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप समजू शकले नाही.