विद्यार्थीच बांधकाम उद्योगाचे भविष्य : व्ही. जी. जाना

0

पुणे । शिक्षण आणि संशोधनासाठी विद्यार्थ्यांना स्पर्धेचा फायदा होत असतो. या माध्यमातून ‘पीसीईआरएफ’ महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता हेरण्याचे काम करीत असून, हे विद्यार्थीच बांधकाम उद्योगाचे भविष्य आहेत. आजच्या विद्यार्थ्यांचे त्वरित मोठ्या पदावर पोचण्याचे स्वप्न असते. मात्र, अपार कष्ट, प्रकल्पावरील कामाचा अनुभव आणि ज्ञान हेच त्या ठिकाणी यशस्वीपणे पोचण्याचा योग्य मार्ग आहे, असे व्ही. जी. जाना म्हणाले.‘पुणे कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग रिसर्च फांउडेशन’तर्फे (पीसीईआरएफ) आयोजित ‘पीसीईआरएफ-पद्मश्री बी. जी. शिर्के विद्यार्थी स्पर्धे’तील स्थापत्य अभियंता पदवीव्यूत्तर गटातील प्रथम पारितोषिक सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाने पटकावले तर, ‘डॉ. भानुबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर’ हे वास्तुविशारद गटातील प्रथम पारितोषिकाचे मानकरी ठरले.

‘पीसीईआरएफ’तर्फे ‘एबीईसी आयटीई’च्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या बांधकाम क्षेत्रावर अधारित 15 व्या ‘कॉन्स्ट्रो 2018’ या प्रदर्शनात स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ झाला. या वेळी प्रख्यात वास्तूविशारद ख्रिस्तोफर बेनिजर, बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नोलॉजी पीव्हीटी लिमिटेडचे कार्यकारी प्रमुख व्ही. जी. जाना, ‘पीसीईआरएफ’ आणि ‘कॉन्स्ट्रो’चे अध्यक्ष विश्‍वास लोकरे, खजिनदार जयदीप राजे, स्पर्धेतील वास्तूविशारद विभागाच्या परिक्षक गटाचे प्रमुख वास्तूविशारद लक्ष्मण थिटे, स्थापत्य अभियंता गटाचे प्रमुख संजय अडसर यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.

या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाने रिस्पॉन्स अनॅलिसिस ऑफ इफेक्टिव्ह लोकेशन अँड पोजिशनिंग ऑफ वेस्ट वॉटर ट्रिटमेंट प्लँट इन हाय राइज स्ट्रक्चर्स हा विषय तर, डॉ. भानुबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चरने परफॉरमन्स बेस्ड् किनेटिक एकाउस्टिक पॅनेल हा विषय निवडला होता.
स्पर्धेतील पदवीपूर्व स्थापत्य अभियंता गटात सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय तर वास्तूविशारद गटात अलाना कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पहिले आले. सिंहगडने स्पर्धेसाठी ऑनलाईन एअर पोल्यूशन कन्ट्रोल सिस्टीम या विषयाची तर, अलाना महाविद्यालयाने प्रपोज्ड् एअरपोर्ट डोमेस्टिक टर्मिनल फॉर रत्नागिरी या विषयाची निवड केली होती.

राज्यातील 70 पेक्षा अधिक शहरांतून सुमारे 300 महाविद्यालयांनी या स्पर्धेसाठी प्रवेश अर्ज केला होता. त्यातून निवड झालेल्या 160 महाविद्यालयांची तीन स्तरावर स्पर्धा घेतली. ज्यामध्ये महाविद्यालयीन, सल्लागार व परिक्षक गटा या स्तरांचा समावेश होता. दहा विद्यार्थ्यांचा एक गट अशा स्वरूपातील पदवीपूर्व व पदवीव्यूत्तर अशा 4 गटात स्पर्धा घेण्यात आली.

विजेत्या महाविद्यालयांची नावे
स्थापत्य अभियांत्रिकी पदवीव्यूत्तर गट – (1) सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय (रिस्पॉन्स अनॅलिसिस ऑफ इफेक्टिव्ह लोकेशन अँड पोजिशनिंग ऑफ वेस्ट वॉटर ट्रिटमेंट प्लँट इन हाय राइज स्ट्रक्चर्स), (2) पिलयी एचओसी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नोलॉजी, पनवेल (रिमोट सेंसिंग अँड जीआयएस अँप्लिकेशन, रेनवॉटर रनऑफ इन मुंबई – ब्ल्यू रूफ नेटवर्क सिस्टीम), (3) ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरीयल सोसायटीचे अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे (वायब्रेशन कन्ट्रोल ऑफ स्ट्रक्चर्स युजिंग कस्टमाइझड् अप्रोच फॉर ट्यून्ड लिक्विड डंपर). स्थापत्य अभियांत्रिकी पदवीपूर्व गट -(1) सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय (ऑनलाईन येअर पोल्यूशन कन्ट्रोल सिस्टीम), (2) महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, कोथरूड (परफॉरमन्स अनॅलिसीस ऑफ बकलिंग रिस्ट्रेन्ड़ ब्रेस फॉर डायनॅमिक लोडिंग), (3) सिंहगड अभियांत्रिकी महाविद्याल, (वडगाव) पुणे (कंपरिशन ऑफ ब्रिज पायर मॉडेल्स फॉर रिड्युसिंग लोकल स्काउर्स). वास्तूविशारद पदवीव्यूत्तर गट – (1) डॉ. भानुबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर (परफॉरमन्स बेस्ड् किनेटिक एकाउस्टिक पॅनेल), (2) डॉ. डी. वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चर, पुणे (विंडो ऑपरेशन अनॅलिसीस अँड डिझाइन स्ट्रॅटर्जी फॉर नॉइज कन्ट्रोल इन इंडियन रेसिडन्स), (3) डॉ. भानुबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, कर्वेनगर (इंटिग्रेशन ऑफ टेन्सेग्रिटी अँड ओरिगामी टू जनरेट हायब्रीड स्ट्रक्चरल मोर्फोलॉजीस)
वास्तूविशारद पदवीपूर्व गट- (1) अलाना कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (प्रपोज्ड् एअरपोर्ट डोमेस्टिक टर्मिनल फॉर रत्नागिरी) (2) अकॅडमी ऑफ आर्किटेक्चर रचना संसद, मुंबई (अँप्लिफिकेशन ऑफ इनफॉरमॅलिटीज इन बांद्रा), (3) डॉ. भानुबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, कर्वेनगर, पुणे (अर्बन इन्सर्ट एट आळंदी)