जळगाव । येथील डॉ. अपर्णा भट-कासार संचलित प्रभाकर कला संगीत अकादमी आयोजित ‘आरंभ’ या कार्यक्रमातील विद्यार्थीनींच्या कथ्थक नृत्य सादरीकरणाने रसिक भारावले. शनिवार सायंकाळी 6.30 वाजता गंधे सभागृहात संगीता राजे निंबाळकर, डॉ.अपर्णा भट-कासार व किरण कासार यांच्या उपस्थितीत दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रारंभी पारंपारिक कथ्थक प्रकारात गुरुवंदना नंतर त्तकार, हस्तक, आमद, थाट, तोडे-तुकडे, कवित्, गत-निकास यांचे विद्यार्थीनींच्या दोन समुहाने सादरीकरण केले.
या गितांवर कथ्थकाचे सादरीकरण
कार्यक्रमाच्या दुसर्या भागात कथ्थक शैलीतील उपशास्त्रीय नृत्याचे सादरीकरण करण्यात आले. त्यात ‘अबीर गुलाल उधळीत रंग.. ’, ‘ बाजे मुरलीया बाजे…’, ‘तराना’, ‘ फिर भोर भई’, ‘ढग दाटुनी येतात, ‘माझे माहेर पंढरी,‘ छुन छुन पायी बाजे पैजण’ ‘ना मानोगे तो दुँगी तुझे गाली रे, ‘ तू ही तू’, ‘मी राधीका मी प्रेमीका’ या हिंदी, मराठी गीतांवरील कथ्थक शैलीतील नृत्यांचा समावेश होता.
या विद्यार्थीनींचा होता सहभाग
स्वानंदी बोरसे, यशश्री मुळे, आयुषी दशपुत्रे, आर्या बाविस्कर, शर्मिष्ठा पाटील, अस्मी देढीया, भार्गवी खैरनार, नेहल भांडारकर, मानसी मकरंदे, रिद्धी सोनवणे, तेजस्वीनी क्षीरसागर, माधवी पसारे, मधुरा इंगळे, भाग्यश्री पाटील, श्रावणी अर्णीकर, अपुर्वा पाटील, श्रावणी बिंबे, स्नेहा गुळवे, जान्हवी जोशी, पुर्वा कुलकर्णी, भावना सुलक्षणे, दिपीका घैसास, रिद्धी जैन, आकांक्षा शिरसाठे, मानसी घोडके, राशी पवार, सायली भावसार, दिया सोनी, गौरी चौधरी या विद्यार्थीनींचा सादरीकरणात समावेश होता.
यांचा झाला सत्कार
‘आरंभ’ या संपूर्ण कार्यक्रमाची कोरीयोग्राफी ऐश्वर्या परशुरामे, शिवानी जोशी, ऋुतुजा महाजन आणि मृणाल सोनवणे यांनी केली होती. साथ-संगत राहुल कासार (तबला), अनिष कुलकर्णी, (तबला), गौरी कुलकर्णी (गायन), गायत्री कुलकर्णी (संवादिनी) आदिंनी केली. ज्ञानज्योत ऍकेडमीतर्फे आयोजित आर्ट टॅलेंट सर्च मधील स्कॉलरशीप प्राप्त विद्यार्थीनी साधीका नेवे, शलाका कानगो, ऋुतुजा मजाहन, ऐश्वर्या परशुरामे, यशश्री मुळे, मृण्मयी कुलकर्णी, हिमानी पिले, तन्वी लाड, साक्षी माळी आदींचा संगीता राजे निंबाळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नृत्य दिग्दर्शिका ऐश्वर्या परशुरामे हीने मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा.स्नेहल परशुरामे व डॉ. प्रिती पाटील यांनी तर आभार दिपीका घैसास यांनी मानले. कार्यक्रमास रसिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.