जळगाव । शाळेतील इयत्ता नववीत शिक्षण घेत असलेल्या अनुसुचित जाती/जमाती प्रवर्गातील मुलींना केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय योजनेतर्गत (एनएसआयजीएसइ) आर्थिक मदत देण्यात येते. नववी उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण योजनेस पात्र विद्यार्थीनीला प्रत्येकी 3 हजारांची आर्थिक मदत देण्यात येते. योजनेसाठी पात्र विद्यार्थींनींचे नावे ऑनलाईन वेबपोर्टलवर माध्यमिक शाळांनी अपलोड करावे असे आदेश माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी दिले आहे. 2013-14 व 2014-15 या वर्षातील पात्र मुलींची माहिती वेबपोर्टलवर उपलब्ध आहे.
मात्र 2012-13 या वर्षातील पात्र मुलींची माहिती वेबपोर्टलवर अपलोड करण्यात आलेली नाही. 28 फेबु्रवारी पर्यत उत्तीण अनुत्तीर्ण विद्यार्थींनीचे नावे वेबपोर्टलवर सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. अद्यापही 3 हजार 140 पात्र विद्यार्थींनीची माहिती अपलोड करण्यात आलेली नसल्याने लाभार्थी लाभापासून वंचीत आहे. 3 हजार 653 विद्यार्थींनीची वैयक्तिक माहिती अद्ययावत करण्यात आलेली आहे. लाभार्थींची यादी पोर्टलवर अपलोड करणे व यादी प्राप्त करुन घेण्याची जबाबदारी गटशिक्षणाधिकारी यांची आहे.
लाभ न मिळाल्यास बीईओ जबाबदार
22 मे पर्यत लाभास पात्र विद्यार्थींनी माहिती वेबपोर्टलवर अपलोड करण्याचे आदेश माध्यमिक शाळांना देण्यात आले आहे. पात्र विद्यार्थीनीस बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर वयाच्या 18 व्या वर्षी सदरील अनुदानाची रक्कम मिळणार आहे. लाभार्थी योजनेपासून वंचीत राहिल्यास सर्वस्वी जाबाबदारी गटशिक्षणाधिकारी यांची राहणार आहे.