फैजपूर । येथील जे.टी. महाजन इंग्लिश व सेमी इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये विद्यार्थीनींनी विद्यार्थ्यांना राख्या बांधून रक्षाबंधन सण उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेच्या प्रांगणावर सामुहिकरित्या राखी बांधण्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी विद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी एस.सी. सरोदे यांनी रक्षाबंधनाचे महत्व व पावित्र समजावे तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्यात स्नेहपूर्ण संबध प्रस्तापित व्हावे. या उद्देशातून दरवर्षी रक्षाबंधन कार्यक्रम साजरा केला जातो. असे सांगून या सणाचे महत्व पटवून दिले. तर शिक्षक हेमंत शिंदे यांनी ही रक्षाबंधन सणाविषयी माहिती दिली. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य एम.पी. जाधव, पर्यवेक्षिका पूनम नेहेते, सर्व शिक्षक वृंद उपस्थिती होते. स्वप्नील लासुरे यांनी सूत्रसंचालन केले तर आभार यामिनी बोरोले यांनी मानले.
जेटीएम मध्ये अनोखे रक्षाबंधन
जे. टी. महाजन अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभागामार्फत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी अनोखे रक्षाबंधन साजरे केले. दरवर्षी भावाला राखी बांधून रक्षाबंधन साजरे करतो. परंतु सीमेवर सदैव करणार्या सैनिक सुद्धा आपले भाऊ आहे. याची जाणीव करुन या विद्यार्थीनींनी राख्या व संदेश जमा करुन भारत-चीन सीमेवर तैनात असलेल्या 350 सैनिकांना पाठवण्याचा अनोखा उपक्रम साजरा आला. सणासुदीला देखील जवानांना आपल्या घरी जाता येत नसल्याने त्यांच्या मनात देखील घराप्रती ओढ निर्माण झालेली असते. त्यांना राखी पाठया उपक्रमाचा संदेश महाविद्यालयातील पियुष किरंगे व स्वप्नील बेंडाळे या विद्यार्थ्यांच्या सहकार्यातून साजरा केला जातो. यावेळी संस्थापक अध्यक्ष शरद महाजन, उपाध्यक्ष आत्माराम भंगाळे, उल्हास चौधरी, प्राचार्या डॉ. नंदीनी चौधरी, उपप्राचार्य डॉ. आर.डी. पाटील, डॉ. पी.एम. महाजन, उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना विद्यार्थी विकास अधिकारी प्राध्यापक सी.व्ही. चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले.