राजगुरुनगर । वरूडे (ता.खेड) येथील रयत शिक्षण संस्थेतील शिक्षकाने नववीत शिकत असलेल्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचा वियभंग केला. ती घरात एकटी असताना तिच्या अंगाला हात लावून मनात लज्जा उत्पन होईल, असे कृत्य त्याने केले. याबाबत कोणालाही सांगू नको अशी धमकी त्याने दिली होती. पीडित मुलीने खेड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर दिपक दौलत फापाळे (वय 37) या शिक्षकाला अटक करण्यात आली.