विद्यार्थी केंद्रबिंदु मानून गोदावरीची आधुनिकतेकडे वाटचाल

0

जळगाव । भविष्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास होणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे विद्यार्थी हाच केंद्रबिंदु मानुन गोदावरी सीबीएसई स्कुल आधुनिकतेकडे वाटचाल करीत असल्याचे मत प्राचार्या निलीमा चौधरी यांनी व्यक्त केले. गोदावरी स्कुलचा वार्षिक बक्षीस वितरणप्रसंगी त्या बोलत होत्या. गोदावरी सीबीएसई स्कुल येथे नर्सरी ते पहीलीतील विद्यार्थ्यांसाठी वार्षिक पारीतोषिक वितरण सोहळा पार पडला. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणुन तुलसीराम अस्वार, रिना खाचणे, जगदिशभाई वडारिया,हेमलता चोपडा या शिक्षक सभेचे सदस्य समुपदेशक लिना चौधरी, ज्योती चौधरी, उपस्थीत होते.

विद्यार्थ्यांसाठी वर्षभरात विविध स्पर्धा
नर्सरी ते पहीलीतील विद्यार्थ्यांसाठी वर्षभरात घेण्यात आलेल्या चित्रकला,नृत्य,एक मिनिट,चित्र बघून उत्तरे, श्लोक,कथा सांगणे, ग्रिटींग कार्ड या विविध स्पर्धांचे पारीतोषिक वितरण करण्यात आले .गोदावरी सीबीएससी स्कूलमध्ये विद्यार्थ्याची शैक्षणिक प्रगती यासह शारीरीक, बौध्दीक, सांस्कृतिक आणि स्पर्धात्मक विकासाबाबत विविध उपक्रम हाती घेतले जातात. विद्यार्थी हा केंद्रबिंदु मानुन गोदावरी स्कुलने आधुनिकतेकडे वाटचाल सुरू केली असल्याचे मत प्राचार्या निलीमा चौधरी यांनी व्यक्त केले. पुढे बोलतांना आगामी काळात नर्सरीपासून संगणक,संस्कृत प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची महत्वाची घोषणा त्यांनी केली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारीतोषिक देण्यात आले. सुत्रसंचालन नदिम शेख, अश्वीनी शिरसाळे, कामीनी ब्रम्हकार या शिक्षकांनी केले. यशस्वीतेसाठी शिक्षक, शिक्षीका आणि कर्मचार्‍यांनी कामकाज पाहिले.