विद्यापीठाचा 2019-20 या वर्षाचा अर्थसंकल्प जाहीर ; विद्यापीठ सदस्यांकडून स्वागत
जळगाव- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सन 2019-20 च्या 287.41 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या अधिसभेत मान्यता देण्यात आली. विविध योजनांतर्गत खर्चासाठी एकूण 287.41 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. विद्यार्थी केंद्रबिंदू मानून विकासाला चालना देणारा असा हा अर्थसंकल्प असून विविध प्रकारच्या नवीन योजना या अर्थसंकल्पात मांडण्यात आल्या आहे. त्याद्वारे विद्यापीठ विकासाला चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करुन सदस्यांनी काही सूचना देखील केल्या.
दीपक पाटील यांनी बहिणाबाईंच्या कवितांचा व सुविचारांचा वापर करीत अर्थसंकल्प सादर केला. त्यांनी अर्थसंकल्प मांडल्यानंतर नितीन ठाकूर, अमोल मराठे यांनी कपात सूचना मांडली. प्रारंभी पुलवामा दहशतवादी हल्ल्यात व गडचिरोलीत नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवान व पोलीसांना श्रध्दांजली अर्पण करणारा ठराव माडण्यात आला. याशिवाय माजी व्य.प.सदस्य छाया नेतकर, माजी सिनेट सदस्य इच्छाराम पाटील, प्राचार्य अ.नि.माळी, सहायक क्रीडा संचालक आर.ए.पाटील, श्रेया काजळे, नाना पाटील, प्रा.शिरीष चौधरी आदी दिवंगतांना श्रध्दांजली वाहणारा शोकप्रस्ताव मांडण्यात आला. प्रश्नोत्तराच्या तासात प्रा.सुनील गोसावी, प्रा.एकनाथ नेहते, नितीन झाल्टे यांच्या प्रश्नांना प्र-कुलगुरु प्रा.पी.पी.माहुलीकर, प्रा.मोहन पावरा, श्री.दिलीप पाटील, प्राचार्य एल.पी.देशमुख, प्रा.ए.बी.चौधरी, बी.पी.पाटील यांनी उत्तरे दिली. सायंकाळी उशिरापर्यंत चाललेल्या या बौठकीत विविध विषयांवर झालेल्या चर्चेत श्री.प्रकाश पाठक, प्राचार्य डी.आर.पाटील, प्राचार्य पी.पी.छाजेड, प्रा.अनिल पाटील, प्राचार्य आर.एस.पाटील, प्रा.संजय सोनवणे, प्रा.एकनाथ नेहते. प्रा.नितीन बारी, प्रा.गौतम कुवर, प्रा.मोहन पावरा, प्रा.किशोर कोल्हे, विष्णू भंगाळे, अमोल सोनवणे, दिनेश नाईक, दिनेश खरात, नितीन ठाकूर, मनिषा चौधरी, अमोल मराठे, राजेंद्र नन्नवरे, शब्बीर सय्यद, नितीन झाल्टे, राजेंद्र जाखडी, सुरेश पाटील, गोपीचंद पाटील यांनी भाग घेवून आपली मते मांडली. निवडणूक आचारसंहिता, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी भरती, शासनाचा 8 मार्च, 2019 चा शासन निर्णय आदी विषयांवर देखील बौठकीत चर्चा करुन सदस्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांनी सदस्यांच्या सर्व भावनांची दखल प्रशासनाकडून घेतली जाईल अशी ग्वाही दिली. बैठकीचे सुत्रसंचालन कुलसचिव भ.भा.पाटील यांनी केले. प्रा.संध्या सोनवणे, नितीन ठाकूर, दिनेश नाईक, सुरेश पवार, अमोल मराठे, मनिषा चौधरी, विष्णू भंगाळे आदींनी हे ठराव मांडले. विद्यापीठातील कवयित्री बहिणाबाई चौधरी अध्यासन केंद्राला मंजूरी दिल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे तसेच विविध सांस्कृतिक व क्रीडा महोत्सवात विद्यापीठाला पारितोषिक प्राप्त झाल्याबद्दल व इतर बाबींबाबत अभिनंदनाचे विविध ठराव मंजूर करण्यात आले.
काय आहे अर्थसंकल्पात ठळक मुद्दे
1 बहिणाबाई चौधरी यांच्या जन्मदिनी दोन दिवसीय विद्यार्थी साहित्य संमेलन घेतले जाणार असून त्यासाठी 5 लाखांची तरतूद
2 अपघाती निधन झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकास 5 लाख 10 हजार रुपयांचे संरक्षण
3 आता नवीन कायदयाप्रमाणे विद्यार्थी परिषदेच्या निवडणूका खुल्या पध्दतीने घेतल्या जाणार असल्यामुळे त्यासाठी 5 लाखाची तरतूद करण्यात आली.
4 शहीद झालेल्या जवानांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी शहीद जवान पालक दत्तक योजना सुरु करण्यात येणार आहे.
5 विद्यापीठ परिसरात पाणी जिरवण्यासाठी बंधारे बांधण्याचा महत्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेण्यात येणार असून त्यासाठी 1 कोटीची तरतूद करण्यात आली आहे.
6 नंदूरबार येथील आदिवासी अकादमीसाठी शासनाकडून दरवर्षी 5 कोटी निधी दिला जाणार आहे.
7 विद्यापीठ व महाविद्यालये यांच्या रेकॉर्ड डिजिटायझेशन व प्रशिक्षणासाठी 55 लाखाची तरतूद
8 दिव्यांग कर्मचार्यांसाठी 5 लाखाने तरतूद वाढविण्यात आली आहे.
9 राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांसाठी 1.25 कोटी, परीक्षा व मूल्यमापन विभागासाठी 26.63 कोटी तरतूद करण्यात आली आहे.
10केंद्रीय प्रशिक्षण व नियुक्ती कक्षासाठी 5 लाखाने तरतूद वाढविण्यात आली.
11 कौशल्याभिमुख शिक्षणासाठी 5 लाखाची तरतूद करण्यात आली.
12 प्रवासी पास सवलत योजनेसाठी 5 लाख तरतूद
13 आर्थिकदृष्टया दुर्बल विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य म्हणून 150 लाखाची तरतूद
14 क्रीडाच्या 13 योजनांसाठी 135 लाखाची तरतूद करण्यात आली.