चोपडा । विद्यार्थ्यांच्या जिवनात खरी गुणवत्ता असेल तर तो यशाचे उंच शिखर गाठू शकतो. गुणवत्ता हाच खरा जिवनातील दागिना आहे. प्रत्येक विद्यार्थीने छञपती शिवाजी महाराज यांचे दुरदृष्टीकोन ठेवून जगात आदर्श निर्माण केला पाहिजे असे प्रतिपादन जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी केले. चोपडा येथे सकल मराठा समाज गुणगौरव सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. सकल मराठा समाज गुणगौरव सोहळा निमित्ताने एकुण 90 गुणवत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी काँपी मुक्त होऊन गुण मिळवावे स्पर्धा परीक्षेत यशस्वी व्हावे, विद्यार्थ्यांनी दुरचित्रवाणीपासुन लाब रहावे असा सल्ला देखील त्यांनी यावेळी दिला. कार्यक्रमाचा सुरुवातीला दिप प्रज्वलन करून छञपति शिवाजी महाराज यांच्या पुतळाला मान्यवरांचा हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. जिजाऊ गायन प्रेरणा पाटील या विद्यार्थीनीने केले.
श्रीमती अनुसयाबाई साळुंखे सभागृहात घेण्यात आलेला सकल मराठा समाज गुणगौरव सोहळा कार्यक्रमाच्या व्यासपिठावर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी आमदार डाँ.सुरेश पाटील, माजी आमदार दिलीपराव सोनवणे, घनःश्याम पाटील, संजिव सोनवणे शातांराम पाटील, संदिप भैय्या पाटील, गोपाळराव पाटील, पोलीस निरीक्षक रामकृष्ण पवार आदींची उपस्थिती होती. सुत्रसंचालन शैलेश वाघ यांनी केले.