शिक्षण मंडळातील नियुक्तीबद्दल सत्कार समारंभ
तळेगाव दाभाडे- शिक्षकांनी संस्कारक्षम व गुणवत्तापुर्ण विद्यार्थी घडविण्यासाठी विशेष परिश्रम घेतले पाहिजे, असे प्रतिपादन तळेगाव दाभाडे नगर परिषदेत नव्याने नियुक्त झालेले शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी एस.एम. गावडे यांनी केले. नवीन समर्थ विद्यालयाने आयोजित केलेल्या सत्कार समारंभात गावडे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे होते. यावेळी शालेय समितीचे अध्यक्ष महेश शहा, सदस्य एस.एन. गोपाळे, मुख्याध्यपक कैलास पारधी आदी उपस्थित होते. प्रशासन अधिकारी गावडे यांच्या हस्ते इयता दहावीमध्ये प्रथम आलेली प्राजक्ता कैलास पगडे, संतोष बनकर, अथर्व गानमोटे व रोहन धायगुडे या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.