विद्यार्थी मिळविण्यासाठी शिक्षकांची प्रलोभने

0

भुसावळ। शासकीय, खाजगी शाळांमधील प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून विद्यार्थी मिळविण्यासाीं शिक्षक पालकांना विविध प्रलोभने देत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. सर्वत्र शिक्षणाचे बाजारीकरण होत आहे. आपली नोकरीही कायम रहावी तसेच विद्यार्थ्यांचा आपल्या शाळेत प्रवेश व्हावा, यासाठी सध्या विविध शाळांमधील शिक्षक चांगलीच माथापच्ची करताना दिसतात. ते भल्या सकाळी ज्या ठिकाणी विद्यार्थी आहे. त्याठिकाणी जावून विद्यार्थ्यांच्या पाल्यांची भेट घेत आपली शाळा कशी इतर शाळांच्या तुलनेत वेगळी आहे हे पटवून देत आहेत.

विद्यार्थ्यांचे दाखले देण्यास शाळेकडून नकार
विद्यार्थी म्हणून नाही तर शिक्षकांना फक्त परिक्षार्थीच हवे काय असा सवाल सध्या दिसत असलेल्या प्रकारामुळे पाल्यांना पडत आहे. सकाळी 6 वाजता पासूनच गावासह परिसरात सर्वत्र शिक्षक, शिक्षिका घरोघरी जाऊन पालक, पाल्य यांना बसवून अनेक प्रलोभन देत आहेत. त्यांच्याकडून शालेय साहित्यही विद्यार्थ्यांना देण्यात येणार असल्याचे आश्‍वासने दिली जात आहे. सध्या विद्यार्थ्यांची मिळविण्याची चढाओढ शिक्षकांकडून होत असल्याचे दिसून येते. काही ठिकाणी तर चक्क चौथ्या वर्गाचे दाखलेच पालकांना देण्यास नकार दिला जात आहे. काही शाळांमध्ये प्रतिक्षा यादी आहे. तर काही ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी भटकंती सुरु आहे. अनेक पालक आपल्या पाल्याला इंग्रजी शाळेत टाकण्याकडे भर देत असल्याने मराठी शाळांमधील शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या शोधार्थ चांगलीच भटकंती करावी लागत आहे.