विद्यार्थी वाचवा मोर्चा संघटना पदाधिकार्‍यांची निवड

0

तालुका प्रमुखपदी रीतेश भारंबे तर तालुका संपर्क प्रमुखपदी पुजा पाटील

भुसावळ : कोरोना महामारीमुळे भयभीत झालेल्या विद्यार्थ्यांना एक आधार म्हणून विद्यार्थी वाचवा मोर्चा (व्ही.व्ही.एम.) ही अराजकीय संघटना महाराष्ट्रभर कार्यरत आहे. या संघटनेच्या भुसावळ तालुका पदाधिकार्‍यांची नुकतीच निवड करण्यात आली. त्यात भुसावळ तालुका प्रमुखपदी रीतेश संजय भारंबे, तालुका संपर्क प्रमुखपदी पुजा तुकाराम पाटील व भुसावळ शहर प्रमुखपदी अक्षय ज्ञानदेव बोरोले व वरणगाव शहर प्रमुखपदी सायली गणेश महाजन यांची नुकतीच निवड करण्यात आली. आजच्या काळात होणारे विद्यार्थ्यांवरील अन्याय आणि संघटनांचा पक्षपातीपणामुळे विद्यार्थ्यांना मनःस्ताप होत आहेतसेच परीक्षांबाबतीत खूप काही संभ्रम सुध्दा आहेत. अशा पार्श्‍वभूमीवर पदाधिकार्‍यांतर्फे विद्यार्थ्यांना न्याय देण्याचे काम संघटनेतर्फे केले जाणार आहे.