विद्यार्थी सुविधा केंद्राचे विद्यार्थ्यांच्या हस्ते केले उद्घाटन!

0

जळगाव। उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ परिक्षेत्रातील चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे बी.पी.कला, एस.एम.ए.विज्ञान व के.के.सी.वाणिज्य महाविद्यालयात उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे विद्यार्थी सुविधा केंद्र सुरु करण्यात आले असून शनिवार या केंद्राचे उद्घाटन कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थी अविष्कार जाधव आणि निकिता महाले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्राध्यापकांसह विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

या ठिकाणी सुरू झालेत केंद्र
कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांनी जळगाव, धुळे, नंदुरबार या तीन जिल्हयातील विद्याथ्र्यांची गौरसोय टाळण्यासाठी फैजपूर, चाळीसगाव, शहादा, नंदूरबार, अमळनेर आणि धुळे या सहा ठिकाणी विद्यार्थी सुविधा केंद्र उघडण्याचे ठरविले आहे. यातील चौथ्या केंद्राचे उद्घाटन शनिवारी चाळीसगाव येथील चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे बी.पी.कला, एस,एम.ए. विज्ञान व के.के.सी.वाणिज्य महाविद्यालयात करण्यात आले. उपस्थित विद्यार्थ्यांपैकी अविष्कार जाधव आणि निकिता महाले यांना कुलगुरुंनी या उद्घाटनाचा मान दिला. विद्याथ्र्यांना अनेकदा गुणपत्रक, श्रेणीसुधार, परीक्षा, पात्रता आदी विविध कामांसाठी विद्यापीठात यावे लागते.

यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक ताणही पडत होता. ही विद्याथ्र्यांची गैैरसोय व आर्थिक ताण टाळावा यासाठी हे सुविधा केंद्र सुरु करण्यात आले आहे. एमकेसीएलचा प्रतिनिधी या केंद्रात पूर्णवेळ कार्यरत राहिल.

कामकाजाचा आढावा सादर
कार्यक्रमाच्या प्रारंभी मिलिंद बिल्दीकर यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य डॉ.प्रकाश बाविस्कर यांनी महाविद्यालयाच्या कामकाजाचा आढावा सादर केला. विद्यापीठाच्या कामकाजाची माहिती जनसंपर्क अधिकारी सुनिल पाटील यांनी दिली. डॉ.पंकज नन्नवरे यांनी सुत्रसंचालन केले. उपप्राचार्य अजय काटे यांनी आभार मानले. यावेळी विद्यापीठाचे संगणक केंद्राचे प्रभारी प्रमुख विनोद पाटील उपस्थित होते. याप्रसंगी महाविद्यालयाच्या परिसरात कुलगुरुंच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तर या विद्यार्थी सुविधेमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणात मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठी विविध सुविधा या ठिकाणी उपलब्ध होणार आहे.