विद्यार्थ्यांची ज्ञानमूल्ये शिक्षकांनी जोपासावीत : डॉ.सुभाष भामरे

0

धुळे। डिजिटल वर्गांमुळे विद्यालये अत्याधुनिक होत आहे. डिजीटल वर्गांमुळे अध्ययन व अध्यापक सुलभ होईल, मुलांची अभ्यासात रुची वाढेल. गुणवत्ता वाढ होत असतानाच विद्यार्थ्यांची ज्ञानमुल्ये जोपासण्याकडेही शिक्षकांनी लक्ष देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांनी केले.

येथील पंचमुखी बहूउद्देशिय युवक मित्र मंडळ संचलित नुतन माध्यमिक विद्यालयातील प्रत्येक वर्ग डिजीटल करण्यात आला. या डिजीटल वर्गांचे उद्घाटन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना डॉ. भामरे म्हणालेे की, माहिती व तंत्रज्ञानाच्या तंत्रज्ञानाच्या या युगात टिकाव धरण्यासाठी पुस्तकांसोबत डिजीटल अध्ययन व अध्यापन आवश्यक आहे. नूतन माध्यमिक विदयालयाचे डिजीटल शाळेत रूपातंर करण्यासाठी न्यूरोसर्जन डॉ.सुशील महाजन यांनी पन्नास हजार रुपयांची मदत केली आहे.डॉ.महाजन यांनी केलेल्या मदतीत संस्थाध्यक्ष देविदास गंगाराम खलाणे यांनी स्वखर्चाने शाळेचे तब्बल सहा डिजीटल वर्ग करण्यात आले आहेत.