तळेगाव स्टेशन । समाजप्रेमी आप्पा प्रतिष्ठान व तळेगाव एमआयडीसी रोटरी क्लब यांच्यावतीने येथील स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलमधील सर्व विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. पायोनियर रुग्णालयाच्या सहकार्याने आयोजित केलेल्या सदर मोफत आरोग्य शिबीराचा लाभ 900 विद्यार्थ्यांनी घेतला. डॉ. शहा आणि सहकार्यांनी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून मार्गदर्शन केले.
या आरोग्य शिबिराचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष संतोष खांडगे यांच्या हस्ते आणि एमआयडीसी रोटरी क्लबचे अध्यक्ष अजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. संस्थेचे सचिव मिलिंद शेलार, प्रकल्प प्रमुख कुसुम वाळूंज, शालेय समिती अध्यक्ष रजनीगंधा खांडगे, सुनील खोल्लम, सुनील भोंगाडे आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. प्रास्ताविक व स्वागत रजनीगंधा खांडगे, सूत्रसंचालन नेहा घाटकर तर आभार शमशाद शेख यांनी मानले.