भुसावळ प्रांताधिकारी यांना युवासेनेने दिले मागणीचे निवेदन
भुसावळ- भुसावळ तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांतील दहावी, बारावी तसेच पदवी, पदव्यूत्तर अभ्यासक्रमांतील विद्यार्थ्यांची माहिती, त्यांच्या शैक्षणिक शुल्काच्या खर्चाची माहिती शासनाने मागविलेली नाही. परीक्षा शुल्कमाफीची घोषणा हवेत विरली जाऊ नये आणि विद्यार्थ्यांच्या पदरी काही तरी पडावे, या दृष्टीने ठोस असे कारवाई करावी. भुसावळच्या दहावी, बारावी तसेच पदवी, पदव्यूत्तरचे शिक्षण घेत आहेत. यासर्व विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ करावे अश्या मागण्यांचे निवेदन युवासेनेच्या वतीने भुसावळ प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांना विद्यार्थीनी आणि युवासेना पदाधिकारी यांच्यातर्फे देण्यात आले.
विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव करू नका असे केले आवाहन
कागदी घोडे नाचविण्याचे काम करू नये, दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेत शासनाने नोव्हेंबरमध्येच परीक्षा शुल्क माफीची घोषणा केली आहे. परंतु परिपत्रक काढले नाही. सर्व विद्यार्थ्यांनी शुल्क भरून टाकले आहे, तरी त्यांना परीक्षा शुल्क लवकरात लवकर परत मिळावे अशी मागणी युवासेना तालुका अधिकारी हेमंत बर्हाटे यांनी प्रांताधिकारी यांना दिली.राज्य शासनाच्या आदेशात केवळ अनुदानित महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनाच माफी न करता विनाअनुदानित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मिळणार नाही, असे सांगण्यात आल्याने विनाअनुदानित महाविद्यालयांतील दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना वार्यावर सोडु नका, तसेच विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव करू नका, अशी मागणी युवासेना शहर अधिकारी सुरज पाटील यांनी केली.
मागीलवर्षी सुद्धा विद्यार्थ्यांचे नुकसान
शैक्षणिक वर्ष 2015 आणि 2016 सुद्धा शासनाने परीक्षा शुल्क माफ केले परंतु विद्यार्थ्यांना त्याच्या फायदा झाला नव्हता. भुसावळ विभागाअंतर्गत दुष्काळ व टंचाईग्रस्त गावातील 40000 विद्यार्थी दहावी, बारावी तसेच पदवी, पदव्यूत्तरचे शिक्षण घेत आहेत, त्यांना लाभ मिळालाच पाहिजेच अन्यथा जिल्हा युवा अधिकारी अविनाश पाटील, सरचिटणीस सूरजसिंग परदेशी, उपजिल्हा युवा अधिकारी चंद्रकांत शर्मा तसेच युवासैनिकांच्या नेतृत्वात आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला. यावेळी भुसावळसह रावेर, यावल, फैजपूर, मुक्ताइनगर भुसावळ परीसरातील विद्यार्थी उपस्थित होते.
यांची होती उपस्थिती
निवेदन देताना युवा तालुका अधिकारी हेमंत बर्हाटे, युवा शहर अधिकारी सुरज पाटील, इयत्ता दहावीच्या विद्यार्थीनी विधी देवकर, भाग्यश्री भोळे व शिवसेना शहर प्रमुख बबलू बर्हाटे, निलेश महाजन, उपशहर प्रमुख धनराज ठाकूर, मृगेन कुलकर्णी, गौरव पवार, अंशुल भाकरे, बबलू धनगर, सुरेंद्र सोनवणे, रोहित महाले, प्रथमेश महाजन, हरीष गावंडे, मनीष जैन, अक्षय ठाकूर, विक्की चव्हाण, पवन बाक्क्षे, भूषण सोनार, मयूर जाधव, सचिन सोनार, ललित सैतवाल, शुभम राजपूत, नितीन पाटील, चेतन नाईक, मनोज पाटील, अजिंक्य पाटील
उपस्थित होते.