कल्याण : विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबात माहिती तसेच आपत्कालीन स्थितीत रुग्णाला काय मदत करायची याबाबत आज कल्याण पश्चिमेकडील मोहिंदर काबूल सिंग शाळेत सुधारक फाउंडेशन और फोर्टिस हॉस्पिटलच्या मध्यमातून सीपीआर ट्रेनिंग चे आयोजन करण्यात आले होते.यावेळी डॉ मंजित सिंह यांनी विद्यार्थ्यांना आरोग्याबाबत घ्यायची काळजी तसेच अत्यवस्थ असलेल्या रुग्णाला रुग्णालयात नेईपर्यंत काय व कशी मदत कराल याबाबत मार्गदर्शन केले.
गंभीर समस्यांबाबत मार्गदर्शन
यावेळी समाज सुधारक फाउंडेशनच्या अध्यक्ष रूपींदर कौर यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर आरोग्याबाबत भेडसावणार्या गंभीर समस्यांबाबत मार्गदर्शन करन आवश्यक असते सुशिक्षित भारतासह सदृढ भारतासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती दिली. जर कुणाची प्रकृती अचानक बिघडली तर या रुग्णाला काय केल्यास वाचवता येईल तसेच श्वास घेन्याची प्रक्रिया, छाती दाबणे, रुग्णाला कशा प्रकारे जमिनीवर झोपवायचे, पल्स तपासून पाहणे, हृदयाशी जोडलेल्या अनेक आजारांवर रुग्ण अत्यवस्थ झाल्यास रुग्णालयात नेईपर्यंत कसेवाचवायचे याबाबत माहिती देण्यात आली.