प्रा.के.एफ.अन्सारी ; यावलमध्ये गुणवंतांना मार्गदर्शन
यावल- मुलांवर पालकांनी करीअरचे ओझे न लादता त्यांची बौध्दीक क्षमता, शारीरीक स्थिती पाहुन त्यांच्या आवडीनुसार क्षेत्र निवड करू द्यावी तरचं ते खर्या अर्थाने आपले करीअर घडवण्यास सक्षम होतील, असे प्रतिपादन मालेगाव येथील शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ प्रा.के.एफ.अन्सारी यांनी केले. ते यावल शहरात अंजुमन रजा ए मुस्तुफा संस्थेकडून आयोजित इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना बोलत होते.
करीयर गाईडन्स कार्यक्रम
शहरातील सुदर्शन चौकात मौलाना आजाद सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात रविवारी करीअर गाईडंन्स कार्यक्रम झाला. अंजुमन ए-रजा-मुस्तुफा व अहेले सुन्नत वल जमातच्या तरूणांनी एकत्रीत येत केले होते. त्यात 10 वी व 12 वीच्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांना करीअरविषयी मार्गदर्शन करण्यात आलेे. अध्यक्षस्थानी प्राचार्य रहिम रजा होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून मालेगावचे प्रसिध्द शिक्षण तज्ज्ञ प्रा.के.एफ.अन्सारी, चोपडा येथील मुफ्ती महेमूद रजा, हाजी मो.याकूब, हाजी मो.ईस्माईल, हाजी मशतरक जागीरदार, मुकद्दर रजवी, हाजी मो. करीम, रीयाज शेख, नसिमोद्यीन रजवी, कार्यक्रमाची प्रास्तावना रियाज खान यांनी केली. यावेळी उपस्थितांना इयत्ता दहावी व बारावीनंतर विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणार्थ कशा प्रकारे व कोण कोेणत्या शैक्षणिक संधी व कार्से आहेत याची देखील माहिती देण्यात आली. आभार मो. अनवर शेख यांनी मानले.