विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शिक्षकांची भूमिका महत्त्वपूर्ण असते – डॉ. कुमार सप्तर्षी

0

शिरूर तालुका माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळा

शिरूर : विद्यार्थी हे शिक्षकांचे अनुकरण करत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शिक्षकांची भूमिका महत्वपूर्ण असते. शिक्षकांनी माणूस घडविण्याचे काम करावे, असे प्रतिपादन माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांनी केले. शिरूर तालुका माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने आयोजित गुणवंत शिक्षक पुरस्कार कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी शिरूर तालुक्यातील गुणवंत मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तरांना तालुकास्तरीय पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. आमदार दत्तात्रय सावंत, सूर्यकांत पलांडे, प्रकाश धारीवाल, रविंद्र ढोबळे, नगराध्यक्षा वैशाली वाखारे, राजेंद्र गावडे, महेश ढमढेरे, सविता बगाटे, मनीषा गावडे, दादासाहेब गवारे, अशोक दरेकर, विश्‍वास कोहकडे, सुभाष उमाप, गणपतराव तावरे, नम्रता गवारे, कांतीलाल गवारे, सदाशिव पवार आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

पुरस्काराने सन्मानित शिक्षक

अर्जुन चव्हाण, शहाजी भोस, अशोक सरोदे यांना गुणवंत मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. अशोक कर्डीले, डॉ. अजित कोकरे, रामदास रोहिले, सरला ढमढेरे, उषा गावडे, पांडुरंग पवार, अंबादास गावडे, उर्मिला मांढरे, रोहिणी आवटी, वर्षा सोनावळे, किशोर गोगावले, नवनाथ बगाटे, मच्छिंद्र खेडकर, रोहिदास पोटे, रोहिदास मांजरे यांना गुणवंत शिक्षक तर प्रकाश राऊत, संजय फलके, सुरेश हांडे यांना गुणवंत शिक्षकेतर पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

उत्कृष्ट शिक्षण संस्थाचालक

याप्रसंगी उत्कृष्ट शिक्षण संस्थाचालक म्हणून माजी आमदार सूर्यकांत पलांडे, पोपटराव गावडे, रविंद्र धनक, रंगनाथ हरगुडे, कांतीलाल शेलार यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दादासाहेब गवारे यांनी केले. शारदा मिसाळ व धर्मेंद्र देशमुख यांनी सूत्रसंचालन केले तर संदीप सरोदे यांनी आभार मानले.