विद्यार्थ्यांच्या जीपला अपघात, 8 ठार

0

झारखंडमधील दुमका जिल्ह्यातील घटना

दुमका : परीक्षेला जाणार्‍या विद्यार्थ्यांची जीप आणि भरधाव ट्रकमध्ये झालेल्या भीषण धडकेत 8 विद्यार्थ्यांच्या मृत्यू झाला. झारखंडच्या दुमका येथे रविवारी हा अपघात घडला. अपघात इतका भीषण होता, की मृतदहे आणि जखमींना जेसीबीने बाहेर काढावे लागले. जीपमधून एकूण 9 जण प्रवास करत होते. त्यापैकी 7 जणांचा जागीच मृत्यू झाला. दुसर्‍या एका विद्यार्थ्याचा उपाचारासाठी नेले जात असताना मृत्यू झाला. मृतांमध्ये एका महिलेचा देखील समावेश आहे. तसेच एका गंभीर जखमीवर दुमका येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

परीक्षेला जात होते विद्यार्थी
मृत्यूमुखी पडलेले सगळेच विद्यार्थी दुमका येथील रहिवासी आहेत. ते सर्व रविवारी देवघर येथे पंचायत सचिव पदाच्या परीक्षेला जात होते. मात्र, रस्त्यातच ही दुर्घटना घडली. जीपमध्ये चालकासह 9 जण प्रवास करत होते. परीक्षा केंद्राच्या दिशेने जाणार्‍या जीपला समोरून येणार्‍या भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. यात जीपचा अक्षरशः चेंदामेंदा झाला.

मृतांची नावे :
सुष्मिता दत्ता, न्यू बाबू पाडा, सौरव दत्ता, संतोष गुप्ता, अंबिका प्रसाद तुरी (ड्राइव्हर), पुरुषोत्तम मांझी, कुमार पाडा, नवीन गोराई, रासिकपूर, स्वास्तिक कुमार, देवेन्द्र गुप्ता.