जळगाव । शहरातील ख्वॉजामियाँ दर्ग्याच्या मागच्या बाजुला असलेल्या रोजलॅण्ड शाळेजवळ बुधवारी दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास विद्यार्थ्यांच्या दोन गटात किरकोळ करणावरून तुफान हाणामारी झाली. याप्रकरणी जिल्हा पोलिस पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे.
विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये किरकोळ कारणावरून हाणमार्यांच्या प्रकारात मोठी वाढ झाली आहे. आयएमआर कॉलेजचे मैदान, मू. जे. महाविद्यालयाचा परिसर, ख्वाँजामियाँ चौक या भागामध्ये दररोज काही ना काही वाद होतच असतात. बुधवारी दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास दहावीचा पेपर सुटल्यानंतर रोजलॅण्ड शाळेच्या बाहेर रस्त्यावर काही विद्यार्थी बसलेले होते. त्याचवेळी बाहेती महाविद्यालयाकडून काही विद्यार्थ्यांचे टोळके आले. बसलेल्या मुलांपैकी एकाने रस्त्याने चालणार्यांना ‘क्या देख राहा है रे’ असे विचारले. या किरकोळ वादातून दोन्ही गटातील विद्यार्थी एकमेकांना भिडले. दोन्ही गटात तुफान हाणामारी झाली.
तिघांना घेतले ताब्यात…
हाणामारी सुरू असताना काही नागरीकांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फोन करून घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिस कर्मचारी राजेंद्र मेंढे, छगन तायडे, रवी तायडे, मनोज कोळी यांनी घटनास्थळावर आले. त्यानंतर हाणमारी करणार्यांनी पळापळ केली. त्यात पोलिसांनी वसीम चंगा शाह, सलाउद्दीन शेख, फैजखान जफर खान यांना ताब्यात घेतले. या हाणामारीत मोईन मुस्ताक बागवान हा जखमी झाला आहे.