विद्यार्थ्यांच्या मनात देशसेवेची भावना रूजली पाहिजे

0

शहादा । विद्यार्थ्यांमध्ये चांगले शिष्य दडले आहे, त्यांच्या मनामध्ये सातत्याने आपल्या देशसेवेची भावना रुजली पाहिजे. विद्यार्थ्यांमध्ये शालेय जिवनापासुन देशप्रेम निर्माण होण्याची संकल्पना त्यांच्यात रुजवावी असे प्रतिपादन भागवतकार हभप खगेंद्र महाराज यानी केले. शहरापासुन सात कि मी अंतरावर असलेल्या कुंजबिहारी प्रतिष्ठाण संचलीत गो शाळेचा आवारात वसंतराव नाइक उच् माध्यमिक विद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबीराचा उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

विद्येसोबत राष्ट्रप्रेमाची जागृती करा
अध्यक्षस्थानी सस्थेचे विभागीय सचिव प्रा संजय जाधव वर्षा जाधव, माजी नगरसेवक व उपाध्यक्ष कुंज बिहारी प्रतिष्ठाण डॉ. योगेश चौधरी सोनवद ग्रामपंचायत सरपंच दिपाली पाटील, उपसरपंच पुंडलीक पाटील, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र वाघ, वनविभागाचे अधिकारी प्रवीण वाघ, युवराज भांबर , द्वारकाधिश महाराज , शिवाजी वाघ, सातपुडा साखरकारखाना संचालक ओंकार चौधरी, प्राचार्य संजय राजपुत, उपप्राचार्य आर. जे. रघुवंशी सह मान्यवर उपस्थित होते. प्रथम मान्यवराचा हस्ते सरस्वती पूजन करुन वृक्षारोपन करण्यात आले. पुढे बोलताना वृक्ष लागवड केल्यानंतर तो जसा वाढत जातो तसे देश प्रेम वाढवा. विद्या ही सुख देणारी आहे त्याचा आदर करा. विद्येसोबत राष्ट्रप्रेम जागृत करावे महाराष्ट्राची भूमी ही संतांची भूमी आहे. संताचे विचार आचरणात आणा. विचारांची पाने लावावीत चांगले फुल मिळेल असे सांगितले. प्रा. संजय जाधव यानी बोलताना विद्यार्थ्यानी स्वतःहुन राष्ट्रसेवा करावी वृक्षलागवड करण्यापेक्षा त्याचे संगोपण करावे जिवन जगण्यासाठी झाड आवश्यक आहे. प्रदूषण वाढत चालले असून त्याचे परिणाम भोगावे लागत आहे . विद्यार्थी दशेपासुन वृक्ष लागवड करण्याचे आवाहन त्यांनी केले. या व्यतिरिक्त सरपंच दिपाली पाटील वनविभागाचे योगेश भाबरे यांनी ही मनोगत व्यक्त केली. प्रास्ताविक व सुत्रसंचलान प्रा. एस. जे. माळी यानी केले. प्रा चंद्रकांत विसपुते यानी आभार मानले. शिबीर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रा निझरे, प्रा शिवाजी माळी यांनी परिश्रम घेतले.