पुणे विद्यापीठाच्या अभियांत्रिकी विभागाच्या वतीने पीसीईटी महाविद्यालयात ‘अविष्कार 2018’ चे आयोजन
पिंपरी चिंचवड : अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांमध्ये असणार्या संशोधक वृत्तीस महाविद्यालय आणि विद्यापीठाने चालना दिली पाहिजे. अशा विद्यार्थ्यांना सक्षम मार्गदर्शन व योग्य पाठबळ मिळाल्यास अविष्कार निर्माण होवून भारताची जागतिक महासत्तेकडे वेगाने वाटचाल होईल, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभियांत्रिकी विभागाचे संचालक डॉ. आदित्य अभ्यंकर यांनी केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभियांत्रिकी विभागाच्या वतीने ‘अविष्कार 2018’ या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या स्पर्धेचे रावेत येथील पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयात आयोजन करण्यात आले होते.
मानवाचे जीवन सुखकर होण्यास मदत…
डॉ. अभ्यंकर म्हणाले की, विद्यार्थ्यांमधील संशोधन वृत्तीला अधिक चालना देण्यासाठी ‘अविष्कार’ संशोधनावर आधारीत या स्पर्धेचे आयोजन विद्यापीठाच्या वतीने करण्यात येते. यामुळे निर्माण झालेल्या स्पर्धेतून अभियांत्रिकीसह मानवाचे जीवन अधिक सुखकर होण्यासाठी विविध विषयांवर मागील बारा वर्षांपासून प्रबंध सादर करण्यात आले आहे. त्याचा लाखो नागरिकांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष उपयोग झाला आहे. त्यातून मानवी जीवन आरोग्यदायी, प्रदुषण मुक्त होण्यास मदत झाली आहे. अशा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा, त्यासाठी पीसीसीओईआर महाविद्यालयाप्रमाणे इतर महाविद्यालयांनी देखील संशोधक वृत्तीच्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केले पाहिजे, असेही अभ्यंकर यांनी सांगितले.
हे देखील वाचा
दोनशेहून अधिक संशोधन प्रकल्प सादर…
या स्पर्धेत पुणे व पिंपरी चिंचवड क्षेत्रातील पन्नास महाविद्यालयातील दोनशेहून जास्त विद्यार्थ्यांनी आपल्या संशोधन प्रकल्पांचे सादरीकरण केले. कार्यक्रमाच्या आयोजनात ईटीसी विभागाचे प्रमुख डॉ. राहुल मापारी यांनी विशेष सहभाग घेतला. यावेळी प्राचार्य डॉ. हरिष तिवारी, विद्यापीठाच्या गुणवत्ता कक्षाचे अध्यक्ष प्रा.डॉ. मोहन वामन, कुलसचिव वासवे, डॉ. वैभव जाधव, ललीत पवार, डॉ. राहुल मापारी, प्रा. निधी खरे आदी उपस्थित होते.
मान्यवरांकडून अविष्काराचे कौतुक…
अविष्कार या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल डॉ. राहुल मापारी व पीसीसीओईआरच्या सर्व प्राध्यापकांचे पीसीईटीचे अध्यक्ष व माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव व्ही.एस. काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भाईजान काझी, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई, पीसीसीओईचे प्राचार्य डॉ. ए.एस.फुलंबरकर, नुतन अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र कानफाडे यांनी कौतुक केले.