चिंबळी : विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर कलेची आवड निर्माण होण्यासाठी सास्कृंतिक कार्यक्रमांचे आयोजन करणे गरजेचे आहे, असे मत आनंद इंग्लिश मेडियम स्कुलचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अनिल काळे यांनी व्यक्त केले. कुरूळी (ता. खेड) येथील आनंद इंग्लिश मेडियम स्कुलचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले.
खेडचे डी. एस. पी. राम पठारे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमास प्रारंभ झाला. यावेळी खेड पंचायत समिती सदस्य अमर काबंळे, अर्जुन म्हसे-पाटील, व्ही. के. मोहन, डॉ. सचिन शहा, जी. बी. मंकिकर, पी. जी. मंकिकर, अनघा काळे, सरपंच चंद्रकांत बधाले, उपसंरपच नगीना मेदनकर, सूर्यकांत बधाले, पो. पाटील प्रतिभा काबंळे, माजी जि.,प.,सदस्य पी. टी. शिदे, ग्रामपंचायत सदस्य अमित मुर्हे, चेअरमन अनिल बागडे, संचालक रमेश बागडे, तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष गुलाब सोनवणे, रामेश्वर सोनवणे, सखाराम बागडे, नाना जैद, माजी चेअरमन बाबासाहेब मुर्हे, गोरुक्ष सोनवणे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरला रेवगडे यांनी केले.