विद्यार्थ्यांना जाणून घेतली जैवविविधतेची माहिती

0

जळगाव । महाराष्ट्र जैवविविधता मंडळ, नागपूर व जलश्री वॉटरशेड सर्व्हेलन्स अँड रिसर्च इन्स्टिटयूट, जळगाव यांच्याद्वारे 3 ते 5 नोव्हेंबर दरम्यान ओळख जैवविविधतेची-समाजासाठी हा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात 4 नोव्हेंबर रोजी मू. जे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी. कुलकर्णी यांनी भूजैवविविधतेबद्दल माहिती दिली व त्यात पटवून दिले की जैवविविधतेची भूगर्भाशी कसा जवळचा संबंध आहे. तसेच विवेक देसाई यांनी जळगाव जिल्ह्यातील सापांच्या जैवविविधतेबद्दल माहिती दिली व समाजातील गैरसमजा बद्दल उदाहरणे दिली. गणेश सोनार यांनी जळगाव जिल्ह्यातील पक्षांच्या जैवविविधतेबद्दल माहिती दिली.

यांचा होता सहभाग
तसेच डॉ. स्वाती संवत्सर यांनी भारतातील जैवविविधतेचा एक दुसर्‍याशी कसा संबंध आहे याची प्रस्तुती केली. यानंतर प्रत्यक्ष जैवविविधतेचा अनुभव घेण्यासाठी 5 नोव्हेंबर 2017 रोजी मनूदेवी येथे क्षेत्रीय भेट आयोजित करण्यात आले होते. या क्षेत्रीय भेटीत ईको ट्रासेक्ट भ्रमण मध्ये 50 प्रकारची झाडे, 60 प्रकारची झुडुपे, 30 प्रकारचे पक्षी आणि 18 प्रकारचे फुलपाखरू यांची ओळख कशी करायची याबद्दलची माहिती डॉ स्वाती संवत्सर, मिलिंद पंडित, गणेश सोनार आणि विवेक देसाई यांनी दिली. डॉ चेतन महाजन यांनी भौगोलिक परिस्थितीकी बद्दल माहिती दिली. तुषार चौधरी व समीर कुरेशी यांनी जैवविविधतेचे जिओ मॅपिग बद्दल माहिती दिली. या कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. यु. डी. कुलकर्णी यांच्या हस्ते प्रमाणपत्र दिले. श्री. संकेत कोर्डे, सौ. योगिनी वाणी, श्री. आबा धनगर व सौ सविता देशमुख यांनी ईको ट्रासेक्ट भ्रमण मध्ये मदत केली.