शिरपूर। येथील शासकिय विश्रामगृहात साक्रीचे आमदार डी.एस.अहिरे यांना तालुक्यातील मुस्लिम बांधवाच्या वतीने शालेय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थांना जातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र मिळण्यास अडचण निर्माण होत असून हि समस्या सोडविण्यासाठी निवेदन देण्यात आले.
यावर आमदार यांनी मुस्लिम (शहा, फकिर) समाजास येणार्या अडचणी सोडविण्यासाठी संबंधित अधिकारी यांना सुचना देऊन उचित न्याय मिळवुन द्यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आमदारांनी जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र संदर्भात येणा-या अडचणी सोडविण्याचे आश्वासन दिले. यावेळी अंजुमन मुस्लिम शहा बिरादरी, शब्बीर शहा, आसिफ शहा, इकबाल शहा, निहाल शहा, इस्माईल शहा, रशीद शहा, अशफाक शहा, फिरोज शहा, निसार शहा, डाँ फिरोज कादरी, खलील शहा, मुनाफ शहा,प्रदीप नांद्रे, उत्पल नांद्रे आदी उपस्थित होते.