विद्यार्थ्यांना टॅबलेटचे वाटप

0

चिंबळी । नन्ही कली या प्रकल्पांतर्गत खेड तालुक्यातील मोई येथील इंदराजी माध्यमिक व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सर्व मुलींना टॅबलेटचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती महाविद्यालयाचे मुख्याध्यापक तोत्रे यांनी दिली.

मुलींमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी म्हणून नंदी फाउंडेशन (हैद्राबाद) यांच्या वतीने नन्ही कली प्रकल्पा अंतर्गत टॅबलेट संच वाटप करण्यात आले. सदर टॅबलेट शाळेचे सचिव तुकाराम उर्फ बाबा गवारे, कार्याध्यक्ष आनंदा दामू गवारे यांचे हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक नवनाथ तोत्रे, जोशी, गिरी, चौधरी, कळसकर, ताजन, रवींद्र गवारे याप्रसंगी उपस्थित होते.