विद्यार्थ्यांना दिलासा : ऑनलाइन अध्ययन अध्यापनाच्या माध्यमातून ज्ञानदान

0

फैजपूर : तापी परीसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागातील सहा.प्राध्यापक शिवाजी मगर यांनी लॉकडाऊन कालावधीचा यथायोग्य वापर करून टी.वाय.बी.एस्सीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम सुरू केले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जगभरात थैमान घालत असताना भारतातही या विषाणूने भारतातही हळू हळू पाय पसरायला सुरुवात केली आहे. या विषाणू प्रदूर्भावाची साखळी खंडित करण्यासाठी भारत सरकार आणि राज्य सरकारच्या वतीने लॉकडाउन सक्तीचे करण्यात आले आहे. या कालावधीचा अध्ययन अध्यापनासाठी उपयोग करता यावा या उद्देशाने ऑनलाईन अध्ययन अध्यापनाची युक्ती अतिशय स्तुत्य आहे.

प्राध्यापकांचे उपक्रमाचे कौतुक
प्रा.शिवाजी मगर स्वतः अभ्यासक्रमातील वेगवेगळे टॉपिक पीपीटी सादरीकरणाने सोप्या पद्धतीने शिकवीत आहेत. यासोबत विविध विद्यापीठातील नामांकित विषय तज्ञांना या ऑनलाइन लेक्चरसाठी आमंत्रित करणार आहेत. 3 एप्रिल रोजी प्रा.डॉ.सुनील सांगळे (वनस्पतीशस्त्र विभाग, राजाराम कॉलेज, कोल्हापूर) यांचे प्लांट ब्रीडींग व 14 एप्रिल रोजी प्रा.डॉ.राजेंद्र राजपूत (इंग्रजी विभाग, धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर) यांचे लिखाण कौशल्ये या विषयावर मार्गदर्शन तृतीय वर्ष विज्ञान विषयाच्या विद्यार्थाना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याबद्दल तापी परीसर विद्या मंडळाचे अध्यक्ष शिरीष चौधरी, सर्व सन्माननीय पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.पी.आर.चौधरी, उपप्राचार्य, वनस्पती शास्त्र विभागप्रमुख प्रा.डॉ.डी.ए.कुमावत, सर्व प्राध्यापकांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे.