जळगाव । विवेकानंद प्रतिष्ठान संचालित, श्रवण विकास मंदीर कर्णबधीर विद्यालयात बैल पोळानिमित्त शालेय परिसरात पारंपारीक पद्धतीने प्रत्यक्षात बैलजोडी आणून त्यांची पूजा करण्यात आली. यानंतर विद्यार्थ्यांना बैल पोळ्याची जाणीव ठेवून दिव्यांग विद्यार्थ्यांना पोळा या सणाद्वारे भारतीय संस्कृतीची महती पटवून देण्यात आली. या प्रसंगी शालेय कर्णबधीर दिव्यांग विद्यार्थिनींनी तसेच सर्व शिक्षकांनी बैल जोडीचे पूजन करुन गोड पुरण पोळीचा नैवेद्य दिला. शेतकरी बैलांना सुरेखरित्या सजवून शाळेत आणल्याबद्दल मुख्याध्यापक पद्माकर इंगळे यांनी शेतकरी दादाला शाळेतर्फे छोटीशी भेट वस्तू देवून कृतज्ञता पूर्वक आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे नियोजन विशेष शिक्षक राजेश फुलपगारे यांनी केले.
गॅस सुरक्षिततेचे महत्व पटविले
कर्णबधीर शाळेतील विद्यार्थ्यांना दैनंदिन घरगुती गॅस सुरक्षेबद्दल माहिती होण्याकरिता एच.पी. गॅस अवंती अक्षदा डिस्ट्रिब्युटर गॅस वितरक यांचे तर्फे गॅस सुरक्षा शिबीर घेण्यात आले. विद्यार्थ्यांना घरगुती गॅस वापरतांना घ्यावयाची काळजी सुरक्षितता तसेच गॅस शेगडी, सिलेंडर, सिलेंडरचे योग्य वजन ओळखणे, गॅस लिक ओळखण्याचे आधूनिक तंत्रज्ञान आदी बाबत गॅस कंपनी तर्फे दिव्या परमार, कविता कोल्हे तसेच छगन जाधव व अमित अग्रवाल यांचे मार्गदर्शन लाभले. या गॅस सुरक्षा शिबीराचे नियोजन विशेष शिक्षिका ज्योती खानोरे दिदी यांनी केले.या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी वृंद उपस्थित होते.