भुसावळ । येथील नाहाटा महाविद्यालयात अर्थशास्त्र विभाग व उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ बीसीयुडी विभागाच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठस्तरीय कार्यशाळा घेण्यात आली. यामध्ये विमुद्रीकरणाचे भारतीय अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम या विषयासंदर्भात चर्चा झाली. याप्रसंगी प्राचार्या डॉ. एम.व्ही. वायकोळे, उपप्राचार्य डॉ. ए.डी. गोेस्वामी, प्रा. एन.ई. भंगाळे, समन्वयक प्रा. व्ही.डी. पाटील, वाणिज्य विभागप्रमुख प्रा. व्ही.जी. कोचुरे, जळगाव पिपल्स बँकेचे व्यवस्थापक युवराज धांडे, डॉ. निता वारुळकर, सुशांत पाटील मंचावर उपस्थित होते.
कॅशलेस व्यवहारासंदर्भात शोध निबंध
याप्रसंगी पिपल्स बँकेचे आयटी अधिकारी सुशांत पाटील यांनी पीपीटीच्या माध्यमातून कॅशलेस व्यवहारांची सखोल माहिती दिली त्यात त्यांनी नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, ई-बँकिंग आदी सुविधांच्या माध्यमातून व्यवहार कसे करावे याबाबत मार्गदर्शन केले. यानंतरच्या सत्रात उमवि परिक्षेत्रातील विद्यार्थी व प्राध्यापकांनी कॅशलेस व्यवहारासंदर्भात वर्तमान स्थिती दर्शविणारे आपले शोध निबंध सादर केले.
यांनी केले मार्गदर्शन
यावेळी अध्यक्षस्थानी ऐनपूर महाविद्यालयाचे प्रा.डॉ. निता वाणी उपस्थित होत्या. त्यानंतरच्या चर्चासत्रात प्रा. एस.टी. सोनवणे, पिपळनेर येथील प्रा.डॉ. सर्जेराव उपस्थित होते. बेंडाळे महिला महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य प्रा. आर.डी. राणे यांनी चलनबंदी, काळा पैसा व भारतीय अर्थव्यवस्थेवरील परिणाम या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी आजपर्यंत जगात कोणकोणत्या देशांनी चलनबंदीचा निर्णय घेतला याचे विवेचन केले.