विद्यार्थ्यांना मोफत पास योजनेचा नियोजना अभावी फज्जा

0

राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे बस आगरप्रमुखांना निवेदन
चाळीसगाव – शासनाने दुष्काळग्रस्त भागात जाहीर केलेल्या मोफत पासच्या प्रशासकीय गोंधळ उडाला असुन पास वाटप करतांना पुरूष व महिला पोलीसांचा बंदोबस्त बस स्थानकात ठेवावा व बस स्थानक परीसरातील पाणपोई लवकर सुरु करावी अशी मागणी निवेदनाद्वारे राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या वतीने चाळीसगाव आगार प्रमुख यांच्याकडे तालुका अध्यक्ष यज्ञेश बाविस्कर व विद्यार्थ्यांनी आज २१ रोजी केली आहे.

महाराष्ट्र शासनाने दुष्काळग्रस्त भागांमध्ये विद्यालयीन व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत पास जाहीर केले आहे. परंतु नियोजनाअभावी याचा फज्जा उडाला असुन चाळीसगाव बस आगारात जागा व कर्मचाऱ्यांअभावी विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. विद्यार्थ्यांची जास्तीची संख्या पाहता मुला मुलींसाठी पुरूष व महिला पोलीस कर्मचारी यांची नियुक्ती करावी. तसेच बसस्थानक परीसरातील पाणपोई चालु करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

निवेदनावर यांच्या आहेत स्वाक्षऱ्या
निवेदनावर राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष यज्ञेश बाविस्कर, अक्षय मोरे, तुषार पाटील, प्रवीण मगर, करण राजपूत, अतुल देवरे, ईश्वर राजपुत, राजेंद्र देवरे, विनायक काळे, अभिषेक पाटील, किरण जाधव, चेतन पवार, रितेश जाधव, वसंत पवार, नेहा परदेशी, निकीता चौधरी, छाया पाटील, दिव्या सुतार, शुभांगी सुतार, मुस्कान मन्यार, वैष्णवी तिकांडे, ललीता जाणे, निकीता नवले, सरला हडपे, सपना धनगर यांच्या सह्या आहेत.