विद्यार्थ्यांना लागणारे दाखले वेळेत द्या

0

जळगाव । नुकताच दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल लागलेला आहे व प्रत्येक विद्यार्थी पुढील शैक्षणिक वर्षात प्रवेशासाठी लागणारे दाखले व प्रमाणपत्र विद्यार्थी व पालकांची तहसिल कार्यालयासह महासेतु, ई महासेवा केंद्रामध्ये दाखले घेण्यासाठी तहसिल कार्यालयाची उंबरठे झिजवत आहे मात्र त्यांना दाखले देण्यास दिरंगाई होत आहे. याबाबत वरिष्ठांनी त्वरीत कार्यवाही न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने दिला आहे.

दोनशे ते पाचशे रुपयांची मागणी
येथील तहसिल कार्यालय परिसरामध्ये दलालांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून दाखले व प्रमाणपत्र त्वरीत मिळविण्यासाठी दलांलानी एक नविन प्रक्रिया अवलंबली आहे. हे दलाल विद्यार्थी व पालकांकडून एका प्रमाणपत्रासाठी दोनशे ते पाचशे रुपयांची मागणी करुन आर्थिक लूट करत असून सहीसाठी विद्यार्थी व पालकांची गैरसोय होतांना दिसत आहे. त्यानुसार तहसिल कार्यालय परिसरात दाखले बनविणार्या दलालांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. या दलांलामुळे विद्यार्थी व पालकांची आर्थिक पिळवणूक होत आहे. याबाबत वरिष्ठ अधिकार्यांकडून त्वरीत योग्य ती कार्यवाही न झाल्यास सनदशीर मार्गाने मात्र तीव्र आंदोलन करण्यात येईल. या आंदोलनात माझ्यासह मनविसे पदाधिकारी अजित शिंदे, संदिप महाले, धनजंय खर्चे, संदिप मांडोळे, योगेश पाटील, पंकज चौधरी आदी कार्यकर्त्यांसह विद्यार्थी व पालक सहभागी होतील.