विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक दाखले वेळेत द्या

0

धुळे । विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रवेश सुरु झाले असून त्यासाठी लागणारे विविध दाखले शासकीय फी नूसार निर्धारीत वेळेत मिळावेत अशी मागणी शिवसेनेने जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दहावी-बारावी निकालानंतर विद्यार्थ्यांची विविध प्रवेशासाठी धावपळ होत आहे. प्रवेशासाठी उत्पन्न दाखला, रहिवास दाखला, जातीचा दाखला, अधिवास दाखला, नागरिकत्व दाखला असे विविध दाखले लागतात. महा-ई सेवा केंद्रात हे दाखले देतांना गैरप्रकार होत असून सेतूधारक व दलाल यांच्या माध्यमातून विद्यार्थी आणि पालकांची आर्थिक लुट होत आहे.

यांची होती उपस्थिती
विद्यार्थ्यांना हे दाखले वेळेत हवे असल्याने अनेकदा जास्तीचे पैसे मोजावे लागतात त्यामुळे प्रशासनाने सर्व सेतू कार्यालयांना आदेश करुन शासकीय दाखले, शासकीय फि घेऊन निर्धारीत वेळेत देण्याचे बंधन घालावे अन्यथा शिवसेना तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडेल, असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.निवेदनावर शिवसेना जिल्हाप्रमुख हिलाल माळी, शिवआरोग्य सेनेच्या डॉ.माधुरी बोरसे, प्रा.शरद पाटील, नगरसेवक संजय गुजराथी, सतिष महाले, महेश मिस्तरी, गंगाधर माळी, अतुल सोनवणे, भगवान करनकाळ, भुपेंद्र लहामगे, हेमा हेमाडे, राजेंद्र पाटील, पंकज गोरे, संदीप सुर्यवंशी, नरेंद्र अहिरे आदींसह शिवसैनिक व महिला आघाडी सदस्यांची नावे आहेत.