खडकी : येथील खडकी शिक्षण संस्थेच्या प्रमिलताई मुनोत बाल शिक्षण मंदिर येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी एम क्युअर फार्मास्युटिकल कंपनीचे सहायक संचालक विक्रम घाडगे, अमित पाटील, गिरीश धनवट, कौस्तुभ केजेळे यांच्यासह संस्थेचे उपाध्यक्ष विलास पंगुडवाले, सहचिटणीस गणेश नाईकरे, मोहन जैन, रमेश अवस्थे, दादा कचरे उपस्थित होते. विद्यार्थ्यांना बॅग, वह्या, जेवणाचा डबा, वॉटर बॉटल, पेन्सिल आदी साहित्य देण्यात आले.