कडूस । राजगुरुनगर सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष स्व. रमेशशेठ ओसवाल यांच्या स्मृतीदिनानिमित्त सिध्देश्वर तरुण मंडळाच्यावतीने वेताळे येथे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. येथील सिध्देश्वर विद्यालय, जि. प. प्रा. शाळा व अंगणवाडीतील मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. तसेच सिध्देश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी देण्यात आलेल्या कॉम्प्युटरसाठी टेबल खुर्च्या व शालोपयोगी साहित्य प्रदान करण्यात आले.
राजगुरुनगर सहकारी बँकेचे विद्यमान संचालक व माजी उपाध्यक्ष दिनेश ओसवाल यांनी हे साहित्य प्रदान केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये हुशारीची कमतरता नाही. कठीण परिस्थितीवर मार करून त्यांनी जिद्दीने पुढे जावे, असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. तसेच गावातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी सरपंच बंडु बोंबले, ज्ञानेश्वर बोंबले, अनंता बोंबले, शंकर बोंबले व ग्रामस्थ आणि शिक्षकवृंद उपस्थित होते. सिध्देश्वर तरुण मंडळाचे संतोष बोंबले, सचिन बोंबले, योगेश सांडभोर, उदय बोंबले, सिध्देश सांडभोर, नितिन कोळी, अनंता वाळुंज, के. के. सांडभोर, वासिम शेख, गणेश बोंबले यांनी हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले. शिक्षक शिवाजी गायकवाड यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.