विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

0

जळगाव प्रतिनिधी । राज्य अन्याय विरोधी मंच, अण्णासाहेब सागरमल सांखला संस्था, भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन मल्टिपर्पज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ९०० शाळकरी मुलांना दप्तरांसह, वह्या, पेन आदी शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी राजेनिंबाळकर तसेच जैन समाजाचे संघपती दलीचंद जैन अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून अप्पर आयकर आयुक्त धरमचंद पारख, सांखला अर्बन सोसायटीचे अध्यक्ष अनिल सांखला, न्यू इराचे विलास जैन, श्री जी कार्पोरेशनचे दीपक सालेचा, माजी महापौर विष्णू भंगाळे, महेंद्र शहा, रजनीकांत शहा, कांतीलाल कोठारी, श्याम नेवे, संगीता पाटील, सतीश सांखलाल, राजेंद्र सांखला उपस्थित होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी म्हणाले की, शिक्षण घेताना अनेक विद्यार्थ्यांना दप्तर, फी, इतर साहित्यही पुरेशे मिळत नाही. मात्र समाजातील दातृत्वांच्या माध्यमातून ही मदत मिळते व उपयोगी पडते. त्यामुळे दातृत्वाची भावना दाखवायला हवी. समाजातून ही मदत तुम्हाला मिळत राहील, तुम्ही मार्ग काढत राहून अभ्यास करत राहा. भारताचा चांगला नागरीक बना. मंचचे जिल्हाध्यक्ष प्रशांत सुरळकर यांनी प्रास्ताविक केले. संदीप केदार, सुनंदा चौधरी यांनी सूत्रसंचालन केले.