विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत सुसंस्कृतपणाचे धडे देण्याची आवश्यकता

0

रावेर। पालक घर-शेती गहाण ठेवून विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण देतात नंतर तोच मुलगा आई-वडिलांना वृद्धाश्रमात ठेवतो म्हणून शिक्षण संस्थांमधून विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत सुसंस्कृतपणाचे धडे देण्याचे कार्य शिक्षकांनी केले पाहिजे, असे प्रतिपादन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केले. सरदार जी.जी.हायस्कूल शाळेच्या शॉपिंग कॉम्प्लेक्सचे उद्घाटन शनिवार 26 रोजी मंत्री महाजन यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते.

यांनी व्यक्त केले मनोगत
खासदार रक्षा खडसे, आमदार हरिभाऊ जावळे, आमदार सुधीर तांबे, माजी खासदार डॉ.उल्हास पाटील आदींनी मनोगते व्यक्त केली. जिल्हा परिषद उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, नगराध्यक्ष दारा मोहम्मद, उपनगराध्यक्षा रंजना गजरे, पं.स.सभापती माधुरी नेमाडे, माजी खासदार गुणवंत सरोदे, माजी शिक्षण सभापती सुरेश धनके, जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, जि.प.सदस्य रंजना पाटील, नंदा पाटील, गोपाल महाराज, भाजपा तालुकाध्यक्ष सुनील पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक उपस्थित होते. प्रास्ताविक संस्थेचे चेअरमन प्रकाश मुजूमदार यांनी केले.

यांची होती उपस्थिती
राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सोपान पाटील, काँगे्रस तालुकाध्यक्ष अर्जुन जाधव, डी.के.पाटील, उपसभापती अनिता चौधरी, नगरसेवक यशवंत दलाल, अनिल अग्रवाल, अशोक वाणी, मंगला देशमुख, शकुंतला महाजन, डी.के.महाजन, अरविंद पाठक, कल्पना पाटील, दिलीप शिंदे, दिलीप अग्रवाल, नगरसेवक सादिक शेख, कृषी उपन्न बाजार समिती सभापती डॉ.राजेंद्र पाटील आदी उपस्थित होते. चेअरमन प्रकाश मुजूमदार, अध्यक्ष अविनाश रावेरकर, उपाध्यक्ष प्रेमचंद गांधी, सदस्य राजेंद्र अग्रवाल, कन्हैय्यालाल अग्रवाल, डॉ.प्रल्हाद पाटील यांनी परिश्रम घेतले.