पिरंगुट । शिंदेवाडी, कासारआंबोली येथील युवकांनी वाढदिवसाचा खर्च टाळून आदिवासी व कातकरी समाजातील मुलांना शालेय साहित्याचे वाटप केले. ग्रामपंचायत सदस्य मोहन शिंदे, उमेश सुतार, छाया भिलारे, आशा लांडगे, कविता शिंदे, चिंतामण शिंदे, गजानन शिंदे, विजय शिंदे, विनायक राऊत, दिनेश अहिरे, आदित्य पात्रेकर, स्वरा शिंदे, दुर्वा कारेकर यांनी हा उपक्रम राबविला. मुठा खोर्यातील शिक्षणापासून वंचित असणार्या आदिवासी, कातकरी समाजातील वातुंडे, पढारवाडी, भोडे येथील 42 विद्यार्थ्यांना वह्या, पेन्सिल, खोडरबर, पाण्याची बाटली, अंगाचा साबण, कपड्याचा साबण, कोलगेट, तेलाची बाटली व खाऊचे वाटप करण्यात आले. कातकरी समाजातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आम्ही आमचा वाढदिवस हे विविध साहित्य वाटप करून साजरा केल्याचे ग्रामपंचायत सदस्य मोहन शिंदे, उमेश सुतार यांनी सांगितले.