‘आयसीक्युब – 2019’ आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप
पिंपरी : सक्षम आधुनिक राष्ट्रनिर्मितीसाठी विद्यार्थ्यांना स्व-अनुभवावरील शिक्षण मिळणे आवश्यक आहे. रोज नव्याने संशोधित होणा-या संशोधनामुळे मानवी जीवन जेवढे सुखकर होत आहे. तेवढेच त्याचे धोकेदेखील वाढत आहेत. मुंबई व पश्चिम महाराष्ट्रातील पूर परिस्थिती, चेन्नई, लातूर शहरातील पाणीटंचाई, मेट्रोसिटींना भेडसावणा-या वाहतूक समस्या याला मानवच जबाबदार आहे. कोणताही दुर्घटना किंवा अपघात निसर्गनिर्मित नसून यास माणूसच जबाबदार असतो. अशा चुका टाळून भावी पिढीच्या हाती सुसंस्कृत, सक्षम, आधुनिक राष्ट्र सोपविण्यासाठी अभियंत्यांनी चिकित्सक वृत्तीने काम केले पाहिजे, असे मार्गदर्शन आयआयटी कानपूर येथील ज्येष्ठ संशोधक डॉ. हरी सहस्त्रबुद्धे यांनी केले.
पिंपरी चिंचवड एज्यूकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) आकुर्डी येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पीसीसीओई) येथे ’कॉम्प्यूटींग, कम्यूनिकेशन कंट्रोल ण्ड टोमेशन’ या विषयावरील ’आयसीक्युब – 2019’ या तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप शनिवारी (दि. 21) डॉ. सहस्त्रबुद्धे यांच्या उपस्थितीत झाला. या वेळी पीसीईटीचे विश्वस्त भाईजान काझी, पीसीसीओईचे प्राचार्य डॉ. अजय फुलंबरकर, समन्वयक प्रा. डॉ. के. राजेश्वरी, प्रा. डॉ. लिना शर्मा, ट्रेनिंग ण्ड प्लेसमेंट सेलचे डीन डॉ. शितलकुमार रवंदळे, डीन डॉ. निळकंठ चोपडे, डॉ. संजय लकडे, डॉ. शितल भंडारी, आयईईई पुणे चे विवेक देशपांडे, मंदार खुर्जेकर आदी उपस्थित होते.
विश्वस्त भाईजान काझी म्हणाले की, पीसीसीओईने सलग 5व्या वर्षी ’आयसीक्युब’ आंतरराष्ट्रीय परिषदेचे यशस्वी आयोजन केले आहे. परिषदेमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेले तज्ज्ञ सहभागी झाले. त्यांचे बहुमोल मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले. पीसीईटी ही संस्था विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी नेहमीच प्रयत्न असते. या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये विविध विषयावरील 461 शोध निबंधांची नोंदणी करण्यात आली. त्यापैकी सुमारे 200 शोधनिबंध तज्ज्ञांसमोर सादर करण्यात आले. यामधून 35 शोधनिबंधांना उत्कृष्ट सादरीकरणाचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमास विविध विभागांचे प्रमुख, विद्यार्थी, प्राध्यापक उपस्थित होते.प्रास्ताविक प्रा. डॉ. लिना शर्मा, सुत्रसंचालन प्रा. अंजली श्रीवास्तव, प्रा. दीपा आबीन तर आभार प्रा. डॉ. के. राजेश्वरी यांनी मानले.
पुढील वर्षी एकाच वेळी पाच आंतरराष्ट्रीय परिषद
‘आयसीक्युब’ आंतरराष्ट्रीय परिषदेला देशातील विविध शैक्षणिक संस्था, विद्यार्थी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत सर्व अभियांत्रिकी विद्याशाखांची एकत्रित परिषद आयोजित केली जात होती. परंतू पुढील वर्षी (2020 मध्ये) आयटी, ई ण्ड टी, मेकॅनिकल इंजिनिअर, सिव्हिल इंजिनिअर आणि सायन्स विभाग या पाच विद्याशाखांची एकाच वेळी स्वतंत्रपणे ‘आयसीक्युबए’ आंतरराष्ट्रीय परिषद घेण्यात येईल, अशी घोषणा प्राचार्य डॉ. अजय फुलंबरकर यांनी परिषदेच्या समारोपप्रसंगी केली.