मेजर हर्षल बोरोले ; धनाजी नाना महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
फैजपूर- विद्यार्थ्यांनी अधिकारी पदासाठी प्रयत्न करावेत. अधिकारी होण्यासाठी प्रामुख्याने बारावीनंतर व पदवीनंतर अधिकारी होता येते. यासाठी विद्यार्थ्यांनी गणित, विज्ञान आणि इंग्रजी या सारख्या विषयांचा अभ्यास करणेे गरजेचा आहे. बारावीनंतर एन.डी.ए. च्या माध्यमातुन व पदवी नंतर एस.एस.बी.च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अधिकारी होण्याची संधी असते. अधिकारी होण्यासाठी प्रामुख्याने बौद्धिक चाचणी, मुलाखत आणि मानस शास्त्रीय चाचण्यांना सामोरे जावे लागते, असे विचार मेजर हर्षल बोरोले यांनी येथे व्यक्त केले. धनाजी नाना महाविद्यालयात भारतीय सैन्यदलात कार्यरत असलेले 17 महार रेजिमेन्टचे मेजर हर्षल बोरोले यांनी विद्यार्थ्यांना भारतीय सैन्यदलाविषयी मार्गदर्शन केले.बोरोल यांनी प्रसंगी विद्यार्थ्यांच्या प्रश्नोत्तरांना त्यांनी उत्तरे दिली. त्यासोबत महाविद्यालयातील विजयी खेळाडूंचे अभिनंदन करुन त्यांचा गौरव केला. खेळासोबत खेळाडूंनी अभ्यासही करावा जेणेकरुन त्यांना अधिकारी होण्यापासुन कोणीही रोखु शकणार नाही परंतु खेळाडू हे फक्त खेळात लक्ष देतात आणि मिळेल त्या पदावर समाधान मानुन खेळण्यात धन्यता मानतात. पण त्यांनी थोडा वेळ अभ्यासात दिला तर ते दोन्ही आघाड्यांवर यशश्वी होतील असा विश्वास त्यांनी दाखविला.
यांची व्यासपीठावर उपस्थिती
अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी होते. प्रमुख उपस्थितांमध्ये गणित विभागाचे विभागप्रमुख प्रा.पी.पी.पाटील, इतिहास विभागाचे विभाग प्रमुख प्रा.डॉ.जगदीश खरात, एन.सी.सी.चे अधिकारी प्रा.राजेन्द्र राजपुत इत्यादी उपस्थित होते. सूत्रसंचालन क्रीडा संचालक प्रा.डॉ.गोविंद सदाशिवराव मारतळे यांनी केले. प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी सरांनी सैन्य दलात अधिकारी होने म्हणजे राजाचे जीवन जगणे आहे असून सांगून राजा होण्यासाठी जे तुम्हाला परीश्रम घ्यावे लागतात तसेच परीश्रम अभ्यासाच्या माध्यमातुन जर तुम्ही घेतले तर तुम्ही नक्किच अधिकारी व्हाल असे सांगितले. डॉ.जी.एस.मारतळे, प्रा.आर.आर.राजपूत, आर.डी.ठाकुर, युवराज गाढे, पंकज मोरे आदींनी परीश्रम घेतले.