फैजपूर । येथील जे.टी. महाजन अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी कल्याण विभागातर्फे मतदान जागृती अभियानांतर्गत यावल तालुक्यातील न्हावी व हिंगोणा या गावांमध्ये पथनाट्य सादरीकरण करुन नागरिकांना मतदानाचे महत्व पटविण्यात आले. या पथनाट्यात 100 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. पथनाट्यातून विद्यार्थ्यांनी नागरिकांना मतदान जागृतीविषयी संबोधन केले. जसे मतदान आपले कर्तव्य व अधिकार, चला मतदान करुया मिळून सारे, बजाऊया आपला अधिकार अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी जनजागृती केली. ज्ञानेश्वर रेंगे या विद्यार्थ्याने दिग्दर्शक म्हणून काम केले. त्यास पियुष किरंगे याचे सहकार्य लाभले.
मान्यवरांची होती उपस्थिती
सुरुवातीला महाविद्यालय परिसरात प्रवेशद्वारापर्यंत रॅली काढण्यात आली. याप्रसंगी संस्थाध्यक्ष शरद महाजन, उपाध्यक्ष आत्माराम भंगाळे, उल्हास चौधरी, प्राचार्या डॉ. नंदिनी चौधरी, उपप्राचार्य आर.डी. पाटील उपस्थित होते. विद्यार्थ्यांना प्रा. सी.व्ही. चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले तसेच अविनाश चौधरी, विमल एजन्सीज व कांचन राणे, भारत टी भुवन आदींचे सहकार्य लाभले.