शिरपूर। शिरपूर येथील आर.सी.पटेल शैक्षणिक संकुलाच्या विविध शाळांमधील पाचवी ते आठवी पर्यंतच्या 14 वर्षेखालील मुलामुलींचे कबड्डी सामने अतिशय उत्साहपूर्ण वातावरणातात प्रारंभ झाला.आर.सी.पटेल संकुलाच्या मेन बिल्डींग येथील भव्य मैदानावर सोमवार दि. 17 जुलै रोजी सकाळी 10 वाजता संस्थेच्या सर्व शाळांचे एकत्रित सामने घेण्यात आले. या स्पर्धांचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
याप्रसंगी कार्यक्रमास प्रभाकरराव चव्हाण, नाटुसिंग गिरासे, प्रितेश पटेल, डॉ. उमेश शर्मा, पी.व्ही.पाटील, सी.डी.पाटील, राबसाहेब चव्हाण, प्रा.विनय पवार उपस्थित होते. अनेक दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थी खेळाडूंचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. प्रास्ताविक क्रीडा शिक्षक दुष्यंत पाटील यांनी केले. सूत्रसंचलन कबड्डी प्रशिक्षक भूषण चव्हाण यांनी केले. आभार क्रीडा शिक्षक आर.यू.चौधरी यांनी मानले. कार्यक्रमास राकेश बोरसे, भूषण बोरसे, एस.एस.जोशी, पी.बी.धायबर, मनोज पाटील, सचिन सिसोदिया, आर.ए.माळी, आर.एस.शिरसाठ, पी.एच.माळी, बी.डी.पाटील, डी.बी.पाटील, निकुंभे, ए.ई.सिसोदे, के.पी.दोरीक, सर्व क्रीडा शिक्षक, सर्व प्रशिक्षक, खेळाडू उपस्थित होते.