विद्यार्थ्यांनी गुणवत्तेसोबतच विविध कलागुण जोपासावेत -महेंद्र मांडे

0

महाराणा प्रताप विद्यालयात वार्षिक समारंभात गुणवंतांचा गौरव

भुसावळ- गुणवत्तेसोबतच विविध कलागुण जोपासा, पारंपरीक ज्ञानासोबत विविध कौशल्य तसेच विविध ज्ञान शाखांमधील शिक्षण घ्या, त्यात नोकरीच्या विविध संधी उपलब्ध असल्याचे विचार श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष महेंद्र (सोनू) मांडे यांनी येथे केले. महाराणा प्रताप विद्यालयाच्या वार्षिक पारीतोषिक वितरण कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
मांडे पुढे म्हणाले की गुणवंत विद्यार्थी मित्र बनवा व टप्प्याटप्प्याने स्वतःच्या गुणवत्तेत सुधारणा करा.

व्यासपीठावर यांची होती उपस्थिती
याप्रसंगी ‘कथा क्रांतीकारकांची’ या हस्तलिखिताचे प्रकाशनही श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष महेंद्र मांडे यांच्या हस्ते करण्यात आले. व्यासपीठावर संस्थेच्या सचिव उषा पाटील, जीवन दीक्षित, मुख्याध्यापक सुरेश शिंदे, पर्यवेक्षिका मंगला मोरे यांची उपस्थिती होती. यावेळी शाळेतील गुणवंत विद्यार्थी, क्रीडा स्पर्धेतील नैपुण्य प्राप्त विद्यार्थी तसेच गणेशोत्सवातील विविध स्पर्धांमधील विजयी विद्यार्थ्यांना तसेच संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील गुणवंतांना तब्बल 705 पारीतोषिकांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. शाळेतील आदर्श विद्यार्थी व क्रीडा क्षेत्रातील एकूण सहा विद्यार्थ्यांना चषक आणि दोन हजार 500 रुपयाचे पारितोषिक देण्यात आले. सूत्रसंचालन रवींद्र खरादे तर अहवाल वाचन मुख्याध्यापक सुरेश शिंदे, यादी वाचन सुधीर भोळे, नितीन धुंदे, दीपाली पाटील, सुरेखा चौधरी यांनी केले. मान्यवरांचा परिचय संजीव पाटील यांनी तर आभार पालक देवेंद्र खरोटे यांनी मानले.