विद्यार्थ्यांनी घेतली वृक्षसंगोपनाची शपथ

0

फैजपूर। धनाजी नाना महाविद्यालयाने राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना आणि विद्यार्थी कल्याण विभागातर्फे महाविद्यालयाच्या आवारात वृक्षारोपण झाले. उपप्राचार्य डॉ.उदय भंगाळे, डॉ.उदय जगताप यांच्यासह रघुनाथ टोके, डॉ.राजहंस आदींची विशेष उपस्थिती होती. राज्य सरकारने हाती घेतलेल्या 4 कोटी वृक्ष लागवडीत खारीचा वाटा उचलण्यासाठी डी. एन. कॉलेजने प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन केले.

त्यानुसार महाविद्यालयाच्या आवारात वेगवेगळ्या प्रजातींच्या रोपांची लागवड करण्यात आली. उपप्राचार्य डॉ. ए.जी.सरोदे, प्रा. डी.बी. तायडे, डॉ. ए.आय. भंगाळे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. जी.जी. कोल्हे, रासेयोचे कार्यक्रम अधिकारी डॉ.शरद बिर्‍हाडे, सहायक अधिकारी प्रा. पी.डी. पाटील, डॉ. ए.के. पाटील प्रा. राजेंद्र राजपूत आदींनी वृक्षलागवड मोहिमेला मूर्त स्वरुप देण्यासाठी परिश्रम घेतले. लावलेल्या रोपांचे संगोपण करण्यासाठी उपस्थितांनी शपथ घेतली. उपप्राचार्य भंगाळे यांनी ’एक व्यक्ती – एक झाड’ या संकल्पनेवर भर दिला. योग प्रशिक्षक रघुनाथ टोके यांनी व्यसनाधीनता आणि युवक या विषयावर संवाद साधला.