भुसावळ । येथील महाराणा प्रताप विद्यालयात वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी वृक्षसंवर्धन आणि संरक्षणाची प्रतिज्ञा घेतली. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना संस्थाध्यक्ष बापू मांडे म्हणाले की, भविष्यातील पर्यावरण संदर्भात धोके लक्षात घेता वृक्षलागवड आणि संवर्धन करावे. यासाठी तरुण पिढीने हातभार लावण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले. सुत्रसंचालन रविंद्र खरादे यांनी तर आभार योगिराज जोशी यांनी मानले.